Advertisement

४० विद्यार्थ्यीनींची रॅगिंगची तक्रार

पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शुक्रवारी रात्री दुसऱ्या वर्षांचे पाच ते सहा विद्यार्थी शिरले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना जबरदस्ती प्रात्यक्षिकांच्या वह्य़ा (जर्नल्स) पूर्ण करण्यासाठी दबाव आणला.

४० विद्यार्थ्यीनींची रॅगिंगची तक्रार
SHARES

पालिकेशी अत्यारित असलेल्या बाळासाहेब ठाकरे (ट्राँम्बे) वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षांच्या ४० विद्यार्थ्यींनींनी रॅगिंगची तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणी रॅगिंगविरोधी समितीने तपास सुरू केला असून गुरुवारी याचा अहवाल येण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः-  बेशिस्त मुंबईकरांवर आता १० हजार कॅमेऱ्यांची नजर

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी प्रकरणानंतर कूपर रुग्णालयात रॅगिंग होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शुक्रवारी रात्री  दुसऱ्या वर्षांचे पाच ते सहा विद्यार्थी शिरले आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना जबरदस्ती प्रात्यक्षिकांच्या वह्य़ा (जर्नल्स) पूर्ण करण्यासाठी दबाव आणला. रात्रीत या वह्य़ा पूर्ण करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहात डांबूनही ठेवले, अशी तक्रार ४० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे सोमवारी केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा