Advertisement

बेशिस्त मुंबईकरांवर आता १० हजार कॅमेऱ्यांची नजर

सध्या मुंबईत पोलिसांचे ५ हजार सीसीटीव्ही लागलेले आहेत. मात्र, एवढे कॅमेरे मुंबईतल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी अपुरे पडत आहेत.

बेशिस्त मुंबईकरांवर आता १० हजार कॅमेऱ्यांची नजर
SHARES

मुंबईकरांनो, सावधान. तुमच्यावर आता १० हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. साधा कचरा जरी टाकला तरी तुम्ही अडचणीत याल. मुंबई शहर स्वच्छ आणि दुर्घटनामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका ५०० ठिकाणी सीसीटीव्ही बसवणार आहे. तर राज्य सरकारही निर्भया फंडातून पाच हजार सीसीटीव्ही लावणार आहे. त्यामुळे बेशिस्त मुंबईकरांवर करडी नजर राहणार आहे. 

सध्या मुंबईत पोलिसांचे ५ हजार सीसीटीव्ही लागलेले आहेत. मात्र, एवढे कॅमेरे मुंबईतल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी अपुरे पडत आहेत. त्यामुळे आता आणखी साडेपाच हजार सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. यामुळे मुंबईकरांवर एकूण १० हजार ५०० कॅमेरांची नजर असणार आहे. मुंबईच्या आप्तकालीन नियंत्रण कक्षाने शहरातील अशी काही ठिकाणं निवडली आहेत, ज्या ठिकाणी वारंवार डेब्रिज किंवा कचरा टाकला जातो. तसंच पावसाळ्यात नेहमी पाणी साचणाऱ्या ठिकाणांचीही यात निवड करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी गुन्हेगारी आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावले आहेत. या सीसीटीव्हींचा फारसा उपयोग मुंबई महापालिकेला होत नाही. त्यामुळेच आता मुंबई महापालिकेकडून इस्त्रायलच्या धर्तीवर व्हिडीओ अॅनालिटिक्स टूल हे आधुनिक तंत्र असणारे सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. या अॅनालिटिक्स टूल असणाऱ्या कॅमेराद्वारे झाड कोसळणे, इमारत पडणे, आग लागणे, पूरस्थिती निर्माण होणे, अवैधरित्या रस्ते-नाल्यांमध्ये कचरा आणि डेब्रीज टाकणे, चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्यास या घटनांचे तात्काळ नोटीफिकेशन पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला मिळतील. त्यामुळे संबंधीत यंत्रणांना लगेच कळवलं जाईल.



हेही वाचा -

रेल्वे प्रवाशांसाठी आता एकच हेल्पलाइन ‘१३९’

IRCTCकडून नाष्टा, जेवणाच्या दरांत बदल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा