Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी आता एकच हेल्पलाइन ‘१३९’

वेगवेगळे हेल्पलाइन क्रमांक बंद करून आता प्रवाशांना सर्व प्रकारच्या सेवेसाठी एकच हेल्पलाईन क्रमांक सुरु ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी आता एकच हेल्पलाइन ‘१३९’
SHARES

वेगवेगळे हेल्पलाइन क्रमांक बंद करून आता प्रवाशांना सर्व प्रकारच्या सेवेसाठी एकच हेल्पलाईन क्रमांक सुरु ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. यानुसार १ जानेवारीपासून १३९ हा एकच नंबर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तर सुरक्षेसंबंधी माहितीसाठी रेल्वे पोलिसांचा (आरपीएफ) १८२ हा नंबर कायम ठेवण्यात येणार आहे

रेल्वे प्रवास करताना अनेक समस्या उद्भवतात. तर अनेकदा प्रशासनाच्या मदतीची आवश्‍यकता असते. दुर्घटना, सुरक्षितता, स्वच्छता आदींसह विविध सेवा, मदत आणि तक्रारींसंबंधी प्रवाशांना थेट प्रशासनाशी संपर्क साधता यावा, यासाठी हेल्पलाइन क्रमांक ठरवून दिले आहेत. मात्र, रेल्वेचे ५ ते ६ वेगवेगळे हेल्पलाइन क्रमांक असल्याने प्रवाशांचा गोंधळ होतो. प्रवाशांकडून एकत्रित हेल्पलाइन क्रमांक सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने केवळ दोन हेल्पलाइन क्रमांक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


१ जानेवारी २०२० पासून रेल्वेचे ६ हेल्पलाइन क्रमांक बंद होणार आहेत. खानपान, स्वच्छता, गाड्यांचे वेळापत्रक आदींबाबत १३९ हा एकच नंबर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. प्रवासात होणारी चोरी, महिला सुरक्षा, फसवणूक आदी रेल्वे सुरक्षा दलाशी संबंधित तक्रारी आणि मदतीसाठी प्रवाशांना 182 या क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.



हे क्रमांक बंद


कॅटरिंग सर्व्हिेसेस - १८००१११३२१

अपघात / सुरक्षा- १०७२

एसएमएस तक्रारी- ९७१७६३०९८२

सामान्य तक्रारी- १३८

दक्षता- १५२२१०

क्लीन माय कोच- ५८८८/१३८


हे क्रमांक सुरू


एकात्मिक रेल्वे हेल्पलाइन - १३९

रेल्वे, आरपीएफ सुरक्षा हेल्पलाइन नंबर - १८२



हेही वाचा  -
मेगाब्लॉकमुळं डोबिवली स्थानकात प्रवाशांचे 'मेगा'हाल
मुंबई-पुणे मार्गवरील 'या' गाड्या पूर्ववत





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा