मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं वाहून गेलेल्या रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीचं काम पूर्ण झाल्यानं १० मेल-एक्सप्रेस गाड्यांची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. मुंबई-पुणे दरम्यान घाटात ३ मार्गिका आहेत. यापैकी अप मार्ग (पुणे-मुंबई) अतिवृष्टीमुळे खचला होता. त्यामुळं ३ ऑक्टोबरपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आसल्यानं घाटातील अन्य मेल-एक्स्प्रेसवरही याचा परिणाम झाला होता.
या मार्गाच्या दुरूस्तीचं काम पूर्ण झालं असल्यानं या मार्गावरील रद्द करण्यात आलेल्या मेल-एक्स्प्रेस पूर्ववत करण्यात आल्या आहेत. यामध्ये (१२७०१-१२७०२) मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस, (१८५२०-१८५१९) एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस, (१७३१८-१७३१७) एलटीटी-हुबळी एक्स्प्रेस, (०७६१८-०७६१७) पनवेल-नांदेड या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली.
मुंबई-पुणे
दरम्यानच्या घाटमार्ग
दुरुस्तीसाठी जानेवारी २०२०
ही कालमर्यादा निश्चित करण्यात
आली होती.
मात्र,
वेळेआधीच
काम पूर्ण करण्यात आलं आहे.
अप
मार्गावरून वेगमर्यादेसह
मेल-एक्स्प्रेस
रवाना करण्यात येणार आहे.
तसंच,
घाटातील
उर्वरित काम पुढील महिनाभर
सुरू राहणार आहे.
मात्र,
त्याचा
मेल-एक्स्प्रेस
वाहतुकीवर परिणाम होणार नाही.
भविष्यात
अतिवृष्टी झाल्यास रुळांखालील
माती वाहून जाऊ नये यासाठी
खडकात खोदकाम करण्यात आले
असून,
त्याचबरोबर
डोंगरावरील माती रुळांवर
येण्यापासून रोखण्यासाठी
रुळांजवळ भिंत उभारण्यात
आल्याची
माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं
दिली.
हेही वाचा -
मुंबईतील 'या' परिसरात अतिवाईट हवा
अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर पुन्हा टीका