Advertisement

मुंबईतील 'या' परिसरात अतिवाईट हवा

वांद्रे-कुर्ला संकुल(बीकेसी) परिसरात मंगळवारी मुंबईकरांना श्वासोच्छवास करताना अधिक त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील 'या' परिसरात अतिवाईट हवा
SHARES

वांद्रे-कुर्ला संकुल(बीकेसी) परिसरात मंगळवारी मुंबईकरांना श्वासोच्छवास करताना अधिक त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे. 'सफर' या हवेची गुणवत्ता नोंदवणाऱ्या प्रणालीनुसार मंगळवारी बीकेसी येथील हवेची गुणवत्ता अतिवाईट नोंदविण्यात आली आहे. पीएम २.५चं प्रमाण अतिवाईट, तर पीएम १०चं प्रमाण वाईट श्रेणीमध्ये नोंदविण्यात आलं आहे. दरम्यान, बुधवारीही अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवेची गुणवत्ता

कुलाबा आणि भांडुप इथं हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची होती. अन्य ठिकाणी हा दर्जा वाईट स्वरूपाचाच नोंदवला गेला. चेंबूरमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक होण्याची शक्यता सोमवारी वर्तवण्यात आली. मात्र, चेंबूरमध्ये हवेची गुणवत्ता वाईट स्वरूपाची होती. मात्र, धोकादायक हवेचा इशारा पुन्हा बुधवारी 'सफर'तर्फे कायम ठेवण्यात आला आहे.

हवेची गुणवत्ता अतिवाईट

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे झालेल्या नोंदीनुसार मुंबईत बुधवारी कुर्ला, वरळी इथं हवेची गुणवत्ता खालावली होती. वरळी इथंही हवेची गुणवत्ता अतिवाईट स्वरूपाची होती. याठिकाणी संध्याकाळी ७ वाजता हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३१६ नोंदवण्यात आला, तर कुर्ला इथं हा निर्देशांक ३०५, सायन ३०८ होता. सायन इथं २९०, तर वांद्रे इथं हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची असल्याचं आकडेवारीवरून समोर आलं. वांद्रे इथं गुणवत्ता निर्देशांक १४४ होता. यामध्ये सर्वाधिक परिणाम पीएम २.५ प्रदूषकांचामुळंच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.


हेही वाचा -

अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर पुन्हा टीका

वर्षाअखेर येणाऱ्या सुर्यग्रहणाचा 'हा' आहे दुर्मिळ योगRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा