Advertisement

वर्षाअखेर येणाऱ्या सुर्यग्रहणाचा 'हा' आहे दुर्मिळ योग

यंदाचे हे सूर्यग्रहण अत्यंत खास असणार आहे. पण का? हे जाणून घेण्यासाठी वाचा खालील बातमी

वर्षाअखेर येणाऱ्या सुर्यग्रहणाचा 'हा' आहे दुर्मिळ योग
SHARES

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण येत्या २६ डिसेंबर रोजी होणार आहे. हे वर्षातले तिसरे सुर्यग्रहण आहे. भारतात सकाळी ८ वाजून १७ मिनिटांनी सुरू होईल आणि १० वाजून ५७ मिनिटांनी संपेल. याच काळात वैज्ञानिकांना सूर्याच्या वायूमंडळात होणाऱ्या हालचालींचा वेध घेता येईल


दुर्मिळ योग

यंदाचे हे सूर्यग्रहण अत्यंत खास असणार आहे. या दिवशी तब्बल ५७ वर्षांनी एक दुर्मिळ योग जुळून येणार आहे. ग्रहणाच्या वेळी ६ ग्रह एकत्र येणार आहेत. यापूर्वी १९६२ मध्ये अशाच प्रकारे ७ ग्रह एकत्र येऊन सूर्यग्रहण तयार झाले होते. असे दुर्मिळ सूर्यग्रहण २९६ वर्षांपूर्वी ७ जानेवारी १७२३ रोजी झालं होतं


इथं दिसणार सुर्यग्रहण

६ जानेवारी आणि २ जुलै रोजी खंडग्रास सूर्यग्रहणे झाली पण ती भारतातून दिसली नव्हती. आताचे कंकणाकृती किंवा वलयांकित सूर्यग्रहण दक्षिण भारतात अनेक ठिकाणी दिसणार आहे. दक्षिण भारतात या ग्रहणाचे सर्वात सुंदर दृश्य दिसेल. कारण इथं कंकणाकृती ग्रहण आणि डायमंड रिंग दिसणार आहे. भारताच्या बाकी भागात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी साडेतीन तासाचा आहे. विविध ठिकाणी ते वेगवेगळया वेळी सुरु होईल आणि संपेल. नेपाळ, भूतान, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, चीन ऑस्ट्रेलिया इथंही ग्रहण दिसणार आहे.  


कंकणाकृती सुर्यग्रहण म्हणजे?

पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हे आपण जाणतो. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येऊन सुर्याला झाकतो तेव्हा सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहण अमावस्येला होते. कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्र सूर्याचा ९७ टक्के भाग झाकतो. या प्रकारचे ग्रहण पृथ्वीवरून फार कमी वेळा पाहता येते.


२०२० मधील सुर्यग्रहण

२०२० मध्ये दोन सूर्यग्रहणे होणार आहेत.  त्यापैकी पहिले २१ जून रोजी होत असून तेही भारतात दिसणार आहे. दुसरे १४ डिसेंबरला होणार असून ते प्रशांत महासागर परिसरात दिसणार आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा