Advertisement

IRCTCकडून नाष्टा, जेवणाच्या दरांत बदल

रेल्वे प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या नाष्टा आणि जेवणाच्या दरांमध्ये आता रेल्वे मंत्रालयानं वाढ करण्यात आली आहेत.

IRCTCकडून नाष्टा, जेवणाच्या दरांत बदल
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमध्ये जेवण व नाष्टा पुरविण्यात येते. या प्रवाशांना पुरवण्यात येणाऱ्या नाष्टा आणि जेवणाच्या दरांमध्ये आता रेल्वे मंत्रालयानं वाढ करण्यात आली आहेत. याबाबतच्या नव्या मेन्यूचं आणि दरांचं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सुधारित दरांनुसार, प्रवाशांना नाष्टा आणि जेवणासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. दि इंडियन रेल्वेज केटरिंग अँड टुरिझमनं‘(आयआरसीटीसी) हे स्पष्ट केलं आहे.

दर निश्चित

जेवणाचे जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते जीएसटी करांसहित असणार आहेत. रेल्वेचे ठराविक खाद्यपदार्थ, जनता मिलसारख्या जेवणाचे मेन्यू आणि त्यांच्या दरांची मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अंमलबजावणी होणार आहे. याच सूचना रेल्वे स्थानकांवरील रिफ्रेशमेंट रुम, जनआहार सारख्या युनिट्ससाठीही लागू असणार असल्याची माहिती रेल्वेच्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

जेवणाची गुणवत्ता

जेवणाच्या दरांमध्ये वाढ केल्यानं जेवणाची गुणवत्ता आणि आरोग्यपूर्ण जेवणामध्ये सुधारणा दिसून येणार असल्याची खात्री आयआरसीटीसी आणि विभागीय रेल्वे कार्यालयानं व्यक्त केली आहे. निश्चित केलेलं हे ध्येय गाठण्यासाठी रेल्वेकडून याची सातत्यानं पडताळणी देखील केली जाणार आहे.

नव्या दरांनुसार, राजधानी, शताब्दी आणि दुरांतो गाड्यांच्या एसी फर्स्ट, एसी सेकन्ड, एसी थर्ड डब्यांसाठी अनुक्रमे नाष्ट्यासाठी १४० रुपये आणि १०५ रुपये इतका दर असणार आहे. तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी २४५ रुपये एसी फर्स्टसाठी तर १८५ रुपये एसी सेकन्ड आणि थर्डसाठी द्यावे लागणार आहेत. तसंच, संध्याकाळचा चहा एसी फर्स्टसाठी १४० रुपये आणि एसी सेकन्ड आणि थर्डसाठी ९० रुपये इतका असणार आहे. तर, दुरान्तो गाड्यांधून स्लीपर क्लासनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाष्ट्यासाठी ६५ रुपये, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी १२० रुपये तर संध्याकाळच्या चहासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

नवे दर

  • व्हेज नाष्टा – ३५
  • नॉन-व्हेज नाष्टा – ४५
  • साधारण व्हेज जेवण – ७०
  • साधारण व्हेज जेवण (अंडा करी) – ८०
  • साधारण व्हेज जेवण (चिकन करी) – १२०
  • व्हेज बिर्याणी (३५० ग्रॅम) – ७०
  • अंडा बिर्याणी (३५० ग्रॅम) – ८०
  • चिकन बिर्याणी (३५० ग्रॅम) – १००
  • स्नॅक मील (३५० ग्रॅम) – ५०हेही वाचा -

सचिन तेंडुलकरची सुरक्षा घटवली

रेल्वे प्रवाशांसाठी आता एकच हेल्पलाइन ‘१३९’संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा