Advertisement

सचिन तेंडुलकर लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सन्मानित

लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आलं आहे.

सचिन तेंडुलकर लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सन्मानित
SHARES

भारताचा माजी कर्णधार महेद्रसिंग धोनी यानं २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अखेरच्या चेंडूवर षटकार मारत विश्वचषक जिकला. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचं भारताला पुन्हा एकदा जगजेतेपद मिळवून देण्याचं स्वप्न साकार झालं. यावेळी विश्वचषक विजयानंतर संघातील खेळाडूंनी सचिनला आपल्या खांद्यांवर उचलून घेऊन संपूर्ण स्टेडियमला फेरी मारली. या दरम्यान सचिन आपल्या चाहत्यांना अभिवादन करत होता. त्यावेळी टिपलेल्या क्षणाला २०००-२०२० या कालावधील क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्या क्षणाला ‘ कॅरीड आन द शोल्डर्स आफ ए नेशन’ शीर्षक देण्यात आलं आहे.

लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सचिनच्या त्या क्षणाला सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्काराला क्रीडा विश्वातील ऑस्कर म्हणून ओळखला जातो. २०००-२०२० या २० वर्षांमध्ये क्रीडा विश्वाताला हा सर्वात भावूक आणि प्रेरणा देणारा क्षण होता. सोमवारी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये लॉरियस पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.


सचिन तेंडुलकरनं स्वत: या सोहळ्याला उपस्थित राहून लॉरियस पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी विजेत्याची निवड सर्वसामान्य जनतेतून केली होती. यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या पुरस्कारासाठी सचिन तेंडुलकरसह जगभरातील २० दावेदारांना नामांकन होतं. त्या सर्वांना मागे टाकत सचिनने हा बहुमान आपल्या नावे केला आहे. बर्लिनमध्ये टेनिस दिग्गज बोरिस बेकरने सचिनला या चषक देऊन सन्मानित केलं.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात 'हेल्थ' एटीएम

मुंबई पूर्व उपनगरात १५ टक्के पाणीकपात



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा