Advertisement

मुंबई पूर्व उपनगरात १५ टक्के पाणीकपात

मुंबई पूर्व उपनगरातील रहिवासांना २४ तासांत पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

मुंबई पूर्व उपनगरात १५ टक्के पाणीकपात
SHARES

मुंबई पूर्व उपनगरातील रहिवासांना २४ तासांत पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. २४ तासांसाठी मुंबई पूर्व उपनगरात १५ टक्के पाणीकपात (Water shortage) करण्यात आलं आहे. काही तांत्रिक बिघाडामुळं मुंबई पूर्व उपनगरातील पाणी कपात करण्यात आलं आहे. त्यामुळं मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या पीसे आणि पांजरपोळ या पंपिंग स्टेशनच्या ठिकाणी विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळं पूर्व उपनगरात १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे, असं मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई उपनगरात कुर्ला ते मुलुंड याठिकाणी १५ टक्के पाणी कपात असणार आहे. त्यामध्ये चेंबूर आणि मानखुर्दचाही समावेश असणार आहे. त्यामुळं २४ तासांसाठी ही पाणी कपात असणार असल्याचं मुंबई महापालिकेच्या जल अभियंता कार्यालयानं जाहीर केलं.

मंगळवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते १८ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत ही १५ टक्के कपात लागू राहणार आहे. या पाणीकपातीमुळं मुंबई महापालिकेच्या टी., एस., एन., एल., एम. ईस्ट, एम. वेस्ट यांसारख्या विभागातील रहिवाशांना कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे.हेही वाचा -

मुंबईतून ११ लाखांचा गुटखा जप्त

सायन उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुलाRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा