मुंबईतून ११ लाखांचा गुटखा जप्त

सांताक्रूझ पूर्वेतील वाकोला येथे सलीमचे दुकान असून तिथे हा साठा लपवून ठेवला होता.

मुंबईतून ११ लाखांचा गुटखा जप्त
SHARES

मुंबईसह राज्यभरात सुंगधीत सुपारी आणि गुटख्यावर बंदी असताना देखील छुप्या पद्धतीने गुटख्याची तस्करी करणाऱ्यांचा गुन्हे शाखा ७ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सलीम शेख (३७)  याला अटक केली असून पोलिसांनी त्याच्याजवळून तब्बल ११ लाखांचा गुटखा जप्त केला आहे. 

 राज्यात बंदी असलेल्या गुटखा, सुगंधी सुपारी आदींचा साठा सलीम याच्याकडे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याची शहानिशा करून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. सांताक्रूझ पूर्वेतील वाकोला येथे सलीमचे दुकान असून तिथे हा साठा लपवून ठेवल्याचे आढळले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

 शरीराला हानीकारक असलेल्या गुटख्याचं उत्पादन (gutka production) आणि त्याची राज्यात बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरूद्ध मकोका (macoca) अंतर्गत कारवाई करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्न व औषध प्रशासन (fda) मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक त्यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.राज्यात यापुढील काळात गुटखाबंदी (gutka ban) कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. गुटखाविक्रीला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देखील पवार यांनी दिला होता. मात्र तरी ही छुप्या पद्धतीने गुटख्याची तस्करी सुरूच असल्यचे या कारवाईतून दिसून येते.  


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा