Advertisement

सायन उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला

मुंबईतील महत्वाकांशी असलेला सायन उड्डाणपूल हा अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

सायन उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला
SHARES

मुंबईतील महत्वाकांशी असलेला सायन उड्डाणपूल (Sion bridge) हा अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (Maharashtra State Roads Development Corporation) पहिला ट्रॅफिक ब्लॉक (Traffic Block) पुर्ण झाला. त्यानंतर मंगळवारपासून पुन्हा एकदा या मार्गावर वाहतुक सुरू झाली आहे. काही कारणात्सव काम रखडल्यानं सोमवारी सुरू होणार सायन उड्डाणपूल मंगळवारी सुरू करण्यात आला. याबाबत एमएसआरडीसीनं पहिल्या ब्लॉकसाठी एक दिवसाचा अतिरिक्त कालावधी लागणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना (Mumbai Police) दिली होती. त्यामुळं मुंबईकरांना सोमवारी मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला होता.

सायन उड्डाणपुलाचं (Sion Bridge) बेअरिंग बदलण्याचं काम १४ फेब्रुवारी रोजी सुरू झालं होतं. त्यामुळं उड्डाणपुलावरील दुतर्फा वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली होती. परंतु, बेअरींग बदलण्याच्या कामात अतिरिक्त वेळ लागल्यानं हे काम एक दिवस आणखी वाढलं.

मुंबईत उड्डाणपुलाचं बेअरिंग बदलण्याचं काम पहिल्यांदाच मोठ्या स्तरावर होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रत्यक्ष बेअरिंग बदलण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी सुरु आहे. बेअरिंग बदलण्याच्या कामादरम्यान वाहतुकीचं नियोजन मुंबई वाहतूक पोलीस (Mumbai Traffic Police) करणार आहेत. त्याचबरोबरीने वाहतूक पोलिसांना मदतीसाठी महामंडळानं ३० ट्रॉफिक वॉर्डन देखील दिले आहे.

बेअरिंग बदलण्याचं काम पूर्ण झाल्यावर उड्डाणपुलाचे (Expansion Joint) बदलण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्याबरोबरच, डांबरीकरणाच्या कामाचा देखील समावेश आहे. या कामासाठी मात्र हा उड्डाणपुल वाहतुकीसाठी सलग २० दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचं नियोजन आहे.

ट्रॅफिक ब्लॉकचे वेळापत्रक

  • 14 फेब्रुवारी रात्री 10.00 वा. ते 17 फेब्रुवारी सकाळी 6.00 वाजेपर्यंत
  • 20 फेब्रुवारी रात्री 10.00 वा. ते 24 फेब्रुवारी सकाळी 6.00 वाजेपर्यंत
  • 27 फेब्रुवारी रात्री 10.00 वा. ते 2 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
  • 5 मार्च रात्री 10.00 वा. ते 9 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
  • 12 मार्च रात्री 10.00 वा. ते 16 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
  • 19 मार्च रात्री 10.00 वा. ते 23 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
  • 26 मार्च रात्री 10.00 वा. ते 30 मार्च सकाळी 6.00 वाजेपर्यंत
  • 2 एप्रिल रात्री 10.00 वा. ते 6 एप्रिल सकाळी 6.00 वाजेपर्यंत


हेही वाचा -

मुंबईच्या कमाल तापमानात मोठी वाढ

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधवांनी विनायक राऊतांना दिला धक्का



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा