Advertisement

मुंबईच्या कमाल तापमानात मोठी वाढ

मुंबईतील कमाल तापमानात (Minimum Temperature) वाढ झाली आहे

मुंबईच्या कमाल तापमानात मोठी वाढ
SHARES

मुंबईतील कमाल तापमानात (Minimum Temperature) वाढ झाली आहे. त्यामुळं मुंबईकरांना थंडीच्या (Winter) दिवसात उकाडा सहन करावा लागतो आहे. सोमवारी मुंबईचं कमाल तापमान ३८ अंशांवर पोहोचला. मुंबईच्या तुलनेत उपनगरात आर्द्रतेचे प्रमाण कमी होतं. परंतु, मुंबईत दुपारी उकाडा वाढला होता. राज्यात सर्वाधिक कमाल म्हणजे ३८.१ अंश तापमानाची (Temperature) नोंद मुंबईत करण्यात आली.  

मोसमातील सर्वाधिक तापमान मुंबईत नोंदविण्यात आले. सांगली, सोलापूर या ठिकाणचा पाराही ३५ अंशापलिकडे पोहोचला. हवामान विभागाच्या अनुमानानुसार, मंगळवारी मुंबईच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, किमान तापमान २४ अंश, तर कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहण्यीच शक्यता आहे.

जमिनीलगत वाहणारे प्रभावी दक्षिण-पूर्व वारे आणि आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे मंगळवारीही तापमानात वाढ होणार आहे. गेल्या ४ दिवसांत राज्यभरातील कमाल तापमानात वाढ होऊन पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला होता. त्यावेळी मुंबईचं तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत होतं. मात्र, सोमवारी मुंबईच्या तापमानात अचानक मोठी वाढ झाली.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रावर रविवारी संध्याकाळी कमाल तापमान ३२.६ अंश, तर सोमवारी सकाळी ८.३० वाजता किमान तापमान १९.८ अंश होतं. संध्याकाळी ५.३० वाजता मुंबईचं कमाल तापमान ३८.१ अंश सेल्सिअसवर पोहचलं. कुलाबा (Colaba) इथं ३४.७ अंश तापमान नोंदविण्यात आले. सांताक्रूझ (Santacruz) येथील कमाल तापमानात सरासरीपेक्षा ७.६ अंश, तर कुलाबा इथं सरासरीपेक्षा ५.३ अंश सेल्सिअसनं वाढ झाली.

राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान होते. विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट झाली, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं १२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.



हेही वाचा -

चुकीला माफी नाही म्हणत छेड काढणाऱ्याला नितीन नांदगावकरांनी दिला चोप

भाजपचं सरकारविरोधात २५ फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा