चुकीला माफी नाही म्हणत छेड काढणाऱ्याला नितीन नांदगावकरांनी दिला चोप

माटुंग्याच्या रेल्वे पादचारी पुलावर महिलांची छेड काढणाऱ्या विकृताला शिवसैनिक नितीन नांदगावकरांनी चांगलाच चोप दिला. शिवाय याविरोधात त्यांनी एक मोहीमच सुरू केलीय. वाचा काय म्हणाले ते?

चुकीला माफी नाही म्हणत छेड काढणाऱ्याला नितीन नांदगावकरांनी दिला चोप
SHARES

माटुंगा रेल्वे स्थानकावर महिलांना छेड काढणारा, चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करणाऱ्या व्यक्तीला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी पकडून चोप दिला आहे. माटुंगा रेल्वे स्थानक इथं छेडछाड करणारा तरूण सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं त्याला अटकही केलं होतं. पण त्याच्याविरोधात तक्रार नसल्यानं पोलिसांना त्याला सोडावं लागलं. रजी हबीबूर खान असं याचं नाव आहे. शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी मात्र त्याला चांगलाच धडा शिकवला आहे.


नांदगावकरांची मोहीम

छेडछाड करणारा आरोपी मोकाट राहिला आणि यांना धडा शिकवला नाही तर हे असंच कृत्य करतील. यासाठी शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी या छेड काढणाऱ्या विकृताला शोधून काढलं आणि चांगलाच चोप दिला. याचा व्हिडियो त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.


काय म्हणाले नितीन नांदगावकर?

महाराष्ट्रातील माझ्या माता -भगिनींना समर्पित.....

जिथे जिथे मुलींवर अत्याचार होतील  आणि ते नराधम वासनेने पछाडलेले मोकाट फिरत असतील तिथे तिथे जाऊन त्यांना ठोकणार.....
हात-पाय शाबूत राहणार नाहीत हा माझा शब्द......
मग तो कोणत्याही जाती-धर्मचा असुदेत त्याची धिंड काढली जाईल...
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रातील तमाम माता -भगिनींच्या संरक्षणाची जवाबदारी घेतो......
रयतेच्या राज्यात  माता -भगिनींना ह्यापुढे  कोणीच  वेड्या वाकड्या नजरेने बघू नये !!
५ दिवस रोज माटुंगा ब्रिज वर येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना कुठेही हात लावून पसार  होणारा विकृत  त्याची हिम्मत होते कशी ?
१५ दिवसा पासून वाट पाहत होतो...
गेले कित्येक दिवस त्याला शोधण्यात गेले कारण त्याचा घरचा पत्ता खोटा ...
या विकृताची जवाबदारी कोण घेणार  ...?
म्हणून अशा विकृतीचे जागेवर हात छाटले गेले पाहिजेत बस ......
मला पर्वा नाही माझे काय होईल याची पण अशा समाजकंटकांना नागडा करणार  !!
"विकृतांना आळा घालणार"

नितीन नांदगावकर छेड काढणाऱ्या या विकृताला पंधरा दिवसापासून शोध घेत होते. अखेर या विकृताची माहिती मिळताच त्यांनी याला पकडून चांगलाच चोप दिला. चोप दिलेलेला व्हिडीओ नितीन नांदगावकर यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला आहे. "मी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अशा विकृत माणसाला धडा शिकवायला हवा. म्हणून मी त्याला असा धडा शिकवला आहे. पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली तरी चालेल, पण मी असं कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही,” असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे.


काय आहे प्रकरण?

माटुंगा परिसरातील रेल्वे पादचारी पुलावर महिला, तरुणींना एकटेपाहून विकृताकडूनअश्लील चाळे केले जात असल्याची घटना पुढे आली आहे. माटुंगाच्या रेल्वे पादचारीपूलावर अंधारात थांबून हा विकृत एकाट्या मुलींना लक्ष करायचा. एकट्या मुलीकडे पाहून हस्तमैथून करणं, मुलींची छेड काढणे हे त्याचे प्रकार सुरूच होते. मात्र कुणी ही पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत नव्हतं. दरम्यान काही दिवसांपूर्वी या विकृतानं एकट्या जाणाऱ्या तरुणीची वाट अडवत तिचं जबरदस्ती चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला.हेही वाचा

मुंबईच्या तरुणीवर अलिबागमध्ये अत्याचार

चक्क तिच्या पोटातून कोकेनच्या 72 कँप्सूल बाहेर काढल्या...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा