मुंबईच्या तरुणीवर अलिबागमध्ये अत्याचार

ऑक्टोबर २०१७ पासून आरोपीने या तरुणीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

मुंबईच्या तरुणीवर अलिबागमध्ये अत्याचार
SHARES

मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या मात्र शिक्षणासाठी अलिबाग येथे वास्तव्यास असलेल्या, तरुणीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा नोंदवून पोलिस त्याचा शोध घेत आहे. 

 हेही वाचाः- वाहनाला बिनधास्त लावा मराठीतली नंबरप्लेट

कांदिवली परिसरात राहणारी पीडित मुलगी अलिबाग येथील नामकिंत महाविद्यालयात वैद्यकिय शिक्षण घेत आहे. तर आरोपी तरुण हा देखील कांदिवलीचा रहिवाशी असून तो महाविद्यालयात होमिओपॅखथिक वैद्यकिय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला आहे.  ऑक्टोबर २०१७ पासून आरोपीने या तरुणीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र तरुणीने लग्नासाठी आणि कुटुंबियांच्या भेटीगाठीसाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने तिला उडवा उडवीची उत्तरे देत, तिला टाळू लागला.  आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपीने पळ काढला. पोलिस चौकशीत आरोपीचे लग्न झाले असल्याचे पुढे आले आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. 

हेही वाचाः- अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण पडले महागात

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा