अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण पडले महागात

अमेरिकेच्या 'नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अ‍ॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन'(एनमॅक) ही संस्था चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कार्यरत आहे. सोशल मिडियावर किंवा संकेतस्थळांवरील चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत ही संस्था माहिती गोळा करून गृहखात्याला पुरवते.

अश्लील व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण पडले महागात
SHARES

मुंबईत अश्लील व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर टाकल्या प्रकरणी सायबर पोलिसांनी शुक्रवारी एका भाजी विक्रेत्याला साकीनाकातून अटक केली आहे. हरिप्रसाद पटेल असे या विक्रेत्याचे नाव आहे. पटेल याने मागीलवर्षी त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरून एका अल्पवयीन मुलाचा अश्लील व्हिडिओ अपलोड केला होता. तो व्हिडिओ सायबर पोलिसांनी डिलीट करून पटेलचे अकाऊंट बंद केले होते. मात्र मित्राच्या मोबाइलवरून पून्हा नवीन अकाऊंट उघडून पटेल पून्हा तेच करू लागल्याचे तपासात पुढे आले आहे. 

 हेही वाचाः -चक्क तिच्या पोटातून कोकेनच्या 72 कँप्सूल बाहेर काढल्या...

भारतात इंटरनेटवर पोनोग्राफीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी सोशल मिडियावर नवनवीन लिंकद्वारे अश्लील व्हिडिओ अपलोड आणि दाखवण्याचे प्रमाण सुरूच आहे.   चाइल्ड पोनोग्राफीची गंभीर गृहमंत्रालयाने घेतली आहे. तसा करारच भारत आणि अमेरिकेत झाला आहे.  अमेरिकेच्या 'नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अ‍ॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन'(एनमॅक) ही संस्था चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात कार्यरत आहे. सोशल मिडियावर किंवा संकेतस्थळांवरील चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत ही संस्था माहिती गोळा करून गृहखात्याला पुरवते. भारतातून अशा ध्वनिचित्रफिती किंवा मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तींची तांत्रिक माहिती नुकतीच या संस्थेने गृहखात्याला पुरवली होती. त्यानुसार या संस्थेने चाइल्ड पोर्नोग्राफी पसरविणारे आयपी अ‍ॅड्रेस आणि अन्य तांत्रिक माहिती वर कारवाई करण्यास सुरूवात केली. 

 हेही वाचाः- वाहनाला बिनधास्त लावा मराठीतली नंबरप्लेट

या माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी मूळ उत्तरप्रदेशच्या आणि सध्या साकीनाका येथे राहणाऱ्या हरिप्रसाद पटेल विरोधात गुन्हा दाखल केला. पटेल याने गेल्या वर्षी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर लहान मुलांचा एक अश्लील व्हिडीओ अपलोड केला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी त्याचे अकाऊंट बंद केले. तरीही हरिप्रसाद याने मित्राच्या मोबाइलवरून नवीन अकाऊंट तयार केले आणि पुन्हा लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ अपलोड केले. याप्रकरणी माहिती मिळताच सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुक्रवारी त्याला अटक केली. सध्या पटेल या पोलिसांच्या कोठडीत आहे. 

 

 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा