चक्क तिच्या पोटातून कोकेनच्या 72 कँप्सूल बाहेर काढल्या...

यातील एखादी कँप्सूल जरी पोटात फुटली असती. तर तरुणीला आपल्या जिवाला मुकावे लागले असते.

चक्क तिच्या पोटातून कोकेनच्या 72 कँप्सूल बाहेर काढल्या...
SHARES
तुम्ही फोटोत पहात असलेले एक्सरे हे कुठल्याही रुग्णाचे नाही आहेत. हे एक्सरे कुणाच्या दुखापतीचे ही नाही आहेत. तर या एक्सरेत दिसत आहे तब्बल कोट्यावधी रुपयांचं ड्रग्ज,अदिस अबाबा येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका 30 वर्षीय तरुणीच्या पोटात हे ड्रग्ज मिळून आले  आहे. जे.जे.रुग्णालयातील डॉक्टरांनी पाच दिवस अथक प्रयत्न कन तिच्या पोटातून कॅप्सूल काढल्या असून तिच्याकडून सव्वा दोन कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आ
 या प्रकरणी तिला गुप्तचार विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे.

अंमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या 30वर्षीय बोलेवियाच्या तरुणीच्या पोटातून कोकेने भरलेल्या 72 कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. जे.जे.रुग्णालयात डाँक्टरांनी पाच दिवस अथक प्रयत्न करून त्या कोकेनने भरलेल्या कँप्सूल शस्ञक्रियेद्वारे बाहेर काढल्या,  यातील एखादी कँप्सूल जरी पोटात फुटली असती. तर तरुणीला आपल्या जिवाला मुकावे लागले असते.

अदिस अबाबा विमानतळावरून मुंबईत आलेल्या या तरुणीचे नाव  करोला लिसेट बोलीवर बेजारानो(30) असे आहे. एआययूला मिळालेल्या माहितीवरून शनिवारी सकाळी या तरुणीला ताब्यात घेण्यात आले. इथोपियन एअरलाईन्सने ती मुंबईत आली होती.  या तरुणीच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता या तरुणीवर वैद्यकीय चाचणी करण्यासाठी शनिवारी न्यायालयाकडे अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात तिचा एक्‍सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या पोटातून या 72 कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन 715 ग्रॅम असून त्याची किंमत दोन कोटी 14 लाख रुपये आहे. या सर्व प्रकरणामागे सांताक्रुज येथे राहणाऱ्या बोलीवियातील नागरीकाचा सहभाग आहे.त्यानेच तिला पोटात कॅप्सूल लपवून प्रवास कसा करायचा, हे शिकवले होते. तस्करी करून आणलेले ड्रग्सही तिला त्याच व्यक्तीचा द्यायचे होते. तिचा तिकीटखर्चही आरोपीने केला होता. याप्रकरणामागे मोठी आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याचे तार अमेरिकेपर्यत पोहोचले आहेत. यापूर्वी या महिलेने अशा पद्धतीने भारतात ड्रग्स आणले का, याबाबत अधिक तपास सुरू आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा