Coronavirus cases in Maharashtra: 920Mumbai: 526Pune: 101Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 25Kalyan-Dombivali: 23Ahmednagar: 23Navi Mumbai: 22Thane: 19Nagpur: 17Panvel: 11Aurangabad: 10Vasai-Virar: 8Latur: 8Satara: 5Buldhana: 5Yavatmal: 4Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Other State Resident in Maharashtra: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 52Total Discharged: 66BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

भाजपचं सरकारविरोधात २५ फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन

राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्येविरोधात येत्या मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी भाजपने राज्यव्यापी (bjp) आंदोलन पुकारलं आहे. रा

भाजपचं सरकारविरोधात २५ फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन
SHARE

राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्येविरोधात येत्या मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी भाजपने राज्यव्यापी (bjp) आंदोलन पुकारलं आहे. राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालय, जिल्हा मुख्यालयांसमोर दिवसभर भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन (protest) करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरणाची समांतर चौकशी, राष्ट्रवादी हट्टाला पेटली

महत्त्वाचं म्हणजे येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय (budget session) अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्याआधीच आंदोलन करुन राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले, नुकतंच भाजपचं महाअधिवेशन झालं या अधिवेशनात भाजपने जनादेशाचा अनादर असा प्रस्ताव पारित केला. या प्रस्तावात आम्ही शिवसेनेने (shiv sena) कसा दगा दिला आणि जनाधाराचा अनादर करत कशी सत्ता स्थापन केली. हे जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. तसंच राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा (women security) प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर देखील आम्ही या आंदोलनातून आवाज उठवणार आहोत.  

आम्ही कुणाचंही सरकार पाडण्यासाठी खेळी करणार नसून सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत. त्यानुसार मागील ३ महिन्यांत या सरकारकडून काय चुका झाल्या, ते देखील लोकांसमोर मांडणार आहोत. त्यासाठी भाजपच्या वतीने २२ ऐवजी २५ फेब्रुवारीला राज्यभरातील ४००तहसिल कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा- हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या, फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवावं, असं आव्हान भाजपला दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक (mid term election) घेऊन जनादेश मिळून दाखवा, असं आव्हान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी राज्य सरकारला दिलं. तसं झाल्यास भाजप (bjp) सत्तेत बसलेल्या तिन्ही पक्षांना पुरून उरेल आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला. 

काहीजण अयोध्येला (ayodhya) जाण्याची भाषा करत आहे. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं जेणेकरुन बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचं स्मरण त्यांना होईल. त्यांचं खरं हिंदुत्वाचं (hindutva) रक्त जागं होईल. हिम्मत असेल तर वीर सावरकरांची (veer savarkar) बदनामी करणाऱ्याच्या 'शिदोरी' मासिकावर बंदी घालून दाखवा नाहीतर सत्तेसाठी लाचार असल्याचं कबूल करा, असंही फडणवीस म्हणाले.

संबंधित विषय
संबंधित बातम्या