Advertisement

हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या, फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान

हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक (mid term election) घेऊन जनादेश मिळून दाखवा, असं आव्हान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी राज्य सरकारला दिलं.

हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्या, फडणवीसांचं ठाकरे सरकारला आव्हान
SHARES

हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक (mid term election) घेऊन जनादेश मिळून दाखवा, असं आव्हान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी राज्य सरकारला दिलं. तसं झाल्यास भाजप (bjp) सत्तेत बसलेल्या तिन्ही पक्षांना पुरून उरेल आणि महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला. 

हेही वाचा- औरंगाबादचं संभाजीनगर करा, शिवसेनेचा मुद्दा मनसेच्या हाती

नवी मुंबईतील भाजपच्या (bjp seminar navi mumbai) दोन दिवसीय अधिवेशानाचा समारोप फडणवीस (Devendra fadnavis) यांनी आपल्या भाषणाने केला. यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यावरही कडाडून टीका केली. ते म्हणाले, २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल वचन बाळासाहेबांना (bal thackeray) दिलं होतं, पण काँग्रेस-राष्ट्रवादीला (congress and ncp) सोबत घेऊन सरकार स्थापन करेन असं वचन बाळासाहेबांना दिलं होतं का? असा प्रश्न उपस्थित करत बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हिंदुत्वाचा (hindutva ) विचार शिवसेना विसरली असल्याचंही फडणवीस म्हणाले. 

काहीजण अयोध्येला (ayodhya) जाण्याची भाषा करत आहे. माझं म्हणणं आहे, की त्यांनी अयोध्येला नक्की जावं जेणेकरुन बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचं स्मरण त्यांना होईल. त्यांचं खरं हिंदुत्वाचं (hindutva) रक्त जागं होईल. हिम्मत असेल तर वीर सावरकरांची (veer savarkar) बदनामी करणाऱ्याच्या 'शिदोरी' मासिकावर बंदी घालून दाखवा नाहीतर सत्तेसाठी लाचार असल्याचं कबूल करा, असंही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- भीमा-कोरेगाव प्रकरणाची समांतर चौकशी, राष्ट्रवादी हट्टाला पेटली

हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. एकमेकांमधील विसंवादातूनच ते पडेल. हिंमत असेल तर एकत्र अंगावर या, आम्ही एकटे असलो तरी तुम्हाला पुरुन उरु असं थेट आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलं.

तुम्हाला लोटलं तरी ऑपरेशन लोटस (operation lotus) कसं? आव्हान स्वीकारणाऱ्या आणि देणाऱ्या शिवसेनाप्रमुखांचा मी पूत्र आहे. म्हणूनच मुख्यमंत्रीपदाचं आव्हान स्वीकारलंय. एप्रिल किंवा उद्या कशाला आताच सरकार पाडून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी जळगाव येथील सभेत बोलताना भाजपला (bjp) दिलं होतं. २० ते २५ वर्ष ज्यांच्या बरोबर राहिलो त्यांनी नाही. तर ज्याच्या विरोधात लढलो त्यांनी विश्वास दाखविल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते.

हेही वाचा-राजकीय उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा