Advertisement

औरंगाबादचं संभाजीनगर करा, शिवसेनेचा मुद्दा मनसेच्या हाती

महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाच्या वाटेवरून चालण्याचं निश्चित केल्यापासून ​महाराष्ट्र नवनिर्माण सेना​​​ आता एक एक करून धार्मिक मुद्द्यांना हात घालू लागली आहे.

औरंगाबादचं संभाजीनगर करा, शिवसेनेचा मुद्दा मनसेच्या हाती
SHARES

महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाच्या वाटेवरून चालण्याचं निश्चित केल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता एक एक करून धार्मिक मुद्द्यांना हात घालू लागली आहे. याच भूमिकेला साजेशी मागणी करत मनसेने औरंगाबादच्या नामांतरणाचा (name change of Aurangabad) मुद्दा हाती घेतला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (mns mla raju patil) यांनी औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर (sambhaji nagar) करावं, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

हेही वाचा- काॅलेजांमध्येही राष्ट्रगीत सक्तीचं, शिवजयंतीपासून अंमलबजावणी

विशेष म्हणजे गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून शिवसेना (shiv sena) औरंगाबादचं नाव बदलून (name change of Aurangabad) संभाजीनगर (sambhaji nagar) करावं, अशी मागणी करत आहे. आता शिवसेना राज्याच्या सत्तेत असताना मनसेने (mns) हाच मुद्दा हाती घेऊन शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.   

औरंगाबादमध्ये (name change of Aurangabad) मनसे नेत्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीला आमदार राजू पाटील (mns mla raju patil) आणि मनसे नेते अभिजीत पानसे (mns leader abhijit panse) उपस्थित होते. या बैठकीत औरंगाबादच्या नामांतरणाच्या विषयावर देखील चर्चा झाली. त्यावर औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, एवढंच नाही, तर राज्य सरकारला तसं करण्यासाठी भाग पाडू, असं आश्वासन यावेळी पाटील यांनी दिलं.


हेही वाचा- केम छो ट्रम्प का?, मनसेचा सवाल

प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी नामांतरावरून शिवसेनेचं (shiv sena) नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. नामांतराच्या मुद्द्यावरून केवळ राजकारण करण्यात आलं. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असूनही नामांतरासाठी त्यांना ठोस भूमिका घेता आली नाही. एखाद्या जिल्ह्याचं नाव (name change of Aurangabad) बदलण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी लागते. परंतु त्यासाठी आधी राज्य सरकारने तशी केंद्राकडे प्रस्ताव सादर केला पाहिजे. परंतु आता मनसे या मुद्द्यावर लढणार असून राज्य सरकारला औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यास भाग पाडणार आहे, असं पाटील म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा