Advertisement

काॅलेजांमध्येही राष्ट्रगीत सक्तीचं, शिवजयंतीपासून अंमलबजावणी

सध्या भारतात देशभक्तीचे वारे वाहत असताना शाळांप्रमाणेच राज्यातील सर्व काॅलेजांमध्येही राष्ट्रगीत (indian anthem compulsary) सक्तीचं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

काॅलेजांमध्येही राष्ट्रगीत सक्तीचं, शिवजयंतीपासून अंमलबजावणी
SHARES

सध्या भारतात देशभक्तीचे वारे वाहत असताना शाळांप्रमाणेच राज्यातील सर्व काॅलेजांमध्येही राष्ट्रगीत (indian anthem compulsary) सक्तीचं करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १९ फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीपासून करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. 

शाळा मराठी असाे किंवा इंग्रजी शाळेच्या दिवसाची सुरूवात होते ती राष्ट्रगीतानेच. पण आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे काॅलेजांमध्येही (colleges) राष्ट्रगीताचे सूर ऐकू येणार आहेत. 

हेही वाचा- आता ५ डे वीक! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर

महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक इंजिनिअरिंग, फार्मसी, डिफार्म, आर्किटेक्ट काॅलेजांसाठीही हा निर्णय लागू असेल. त्यामुळे काॅलेजातील ३० लाख आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागातील २० लाख विद्यार्थी 'जन गण मन' म्हणतील. या माध्यमातून देशभक्तीची भावना रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे पहिले राज्य असणार आहे. काॅलेजांच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी, असे निर्देश राज्यातील सर्व काॅलेजांना देण्यात आल्याचं उदय सामंत (uday samant) यांनी सांगितलं.

हेही वाचा- केम छो ट्रम्प का?, मनसेचा सवाल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा