Advertisement

आता ५ डे वीक! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर

राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (state government employees) महाराष्ट्र सरकारने मोठी खूशखबर दिली आहे. २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना ​५ दिवसांचा (5 day week) आठवडा​​​ लागू होणार आहे.

आता ५ डे वीक! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर
SHARES

राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (state government employees) महाराष्ट्र सरकारने मोठी खूशखबर दिली आहे. २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा (5 day week) आठवडा लागू होणार आहे. यासंदर्भातील महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या (cabinet meeting) बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातील ६ दिवसांऐवजी ५ दिवस काम करण्याची मुभा मिळणार आहे.

हेही वाचा - यापुढं २ अपत्ये असणाऱ्यांनाच सवलती, शिवसेनेनं आणलं विधेयक  

गेल्याच आठवड्यात राजपत्रित अधिकारी (gazetted officer) महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचं सांगितलं होतं. 

सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामाची ४५ मिनिटे वाढवून ५ दिवसांचा आठवडा करता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. राज्य सरकारच्या सर्व विभागांसाठी ही सवलत लागू होणार असली, तरी अत्यावश्यक सेवा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र ५ दिवसांच्या आठवड्याची सवलत लागू होणार नाही, असंही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.  

यावरून मुख्यमंत्री सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा करण्याबाबत सकारात्मक असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

हेही वाचा -AAP पाठोपाठ महाराष्ट्रातही १०० युनिट वीज मोफत…

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा