Advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, होणार ५ दिवसांचा आठवडा

राज्य सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना (government employees) लवकरच आठवड्यातील ६ दिवसांऐवजी ५ दिवस काम करण्याची मुभा मिळणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, होणार ५ दिवसांचा आठवडा
SHARES

राज्य सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना (government employees) लवकरच आठवड्यातील ६ दिवसांऐवजी ५ दिवस काम करण्याची मुभा मिळणार आहे. यामागचं कारण म्हणजे राज्य सरकार ५ दिवसांचा आठवडा (5 day week) करण्याबाबत सकारात्मक असल्याचं नुकत्याच झालेल्या बैठकीत दिसून आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनीच तसे संकेत दिले आहेत.    

हेही वाचा- राज्याच्या तिजोरीत खडखडाट, निधी अभावी ‘१ रुपयात आरोग्य तपासणी’ योजना गुंडाळणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा (5 day week) करण्याबाबतचा प्रस्ताव सध्या राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. राजपत्रित अधिकारी (gazetted officer) महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांची बैठक झाली. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामाची ४५ मिनिटे वाढवून ५ दिवसांचा आठवडा करता येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या सर्व विभागांसाठी ही सवलत लागू होणार असली, तरी अत्यावश्यक सेवा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र ५ दिवसांच्या आठवड्याची सवलत लागू होणार नाही, असंही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.  

राज्यात ५ दिवसांचा आठवडा (5 day week) करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर आपल्याकडे पाठवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

राज्यातील रिक्त पदे भरण्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी भाष्य केलं. राज्य सरकारच्या विविध विभागांतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सरकारने सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा- शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर लावले आशीष शेलारांचे नग्नफोटो

या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीच्या विषयावरही चर्चा करण्यात आली. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली असता, कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीचा अहवाल पुढील दीड महिन्यांच्या आत सादर करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. या बरोबरच महागाई भत्त्याची थकबाकी देण्याबाबतही सरकार सकारात्मक विचार करत असल्याचे कुंटे म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा