Advertisement

शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर लावले आशिष शेलारांचे अर्धनग्न फोटो

महाराष्ट्रा हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असं वादग्रस्त वक्तव्य शेलार यांनी केलं.

शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाबाहेर लावले आशिष शेलारांचे अर्धनग्न फोटो
SHARES

भावनेच्या भरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर एकेरी टिका करणे भाजप आमदार आशिष शेलार यांना चांगलेच महागात पडत आहे. मंगळवारी नांदेड, औरंगाबाद, कोल्हापूर येथे शिवसैनिकांनी शेलारांच्या पुतळ्याचे दहन केले. तर मुंबईत शिवसैनिकांनी भाजप आमदार आशिष शेलार यांचे वादग्रस्तं होर्डिंग भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरच लावले आहे. या होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये नग्नं अवस्थेत दाखवण्यात आले असून त्यावर “आ’शिषे’ मे देख” अशी वाक्य लिहण्यात आली आहेत.

हेही वाचाः- राज्याच्या तिजोरीत खडखडाट, निधी अभावी ‘१ रुपयात आरोग्य तपासणी’ योजना गुंडाळणार

 शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) सीएए आणि एनआरसीबाबत (caa and nrc) आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, शिवसेनेने (shivsena) काँग्रेस (congress), राष्ट्रवादीसोबत (ncp) मिळून महाविकास आघाडी सरकार (maha vikas aghadi) स्थापन केलं असलं, तरी शिवसेनेने हिंदुत्व (hindutva) सोडलेलं नाही. सीएएमुळे कोणाच्या नागरिकत्वाला धक्का लागणार नाही. मात्र राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे केवळ मुस्लीम समुदायालाच नव्हे, तर हिंदुंनासुद्धा नागरिकत्व सिद्ध करणं जड जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी एनआरसीला विरोध दर्शविला.

हेही वाचाः- माहुलवासीयांच्या मदतीला आदित्य ठाकरे

उद्धव ठाकरे यांना उत्तर देताना भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार (bjp mla ashish ahelar) यांची जीभ घसरली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वसई जनता सहकारी बँकेचे माजी संचालक सुरेश जोशी यांच्या स्मृत्तीदिनानिमित्त नालासोपाऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना शेलार म्हणाले की, “शिवसेना (shiv sena) सध्या एवढे रंग बदलत आहे की रंग बदलणारा सरडाही आत्महत्या करेल. सीएए (caa) हा केंद्र सरकारचा कायदा आहे. त्यामुळे महाराष्ट्रा हा कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असं वादग्रस्त वक्तव्य शेलार यांनी केलं. 

त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी मंबईत अनेक ठिकाणी आशिष शेलार यांच्या विरोधात निदर्शने केली आणि होर्डिंगही लावलेत. मंगळवारीही आशिष शेलार यांची बुद्धी गुडघ्यामध्ये आहे, अशी टीका करत त्यांच्याविरोधात मंगळवारी डोंबिवलीत शिवसेनेतर्फे ‘जोडेमारो’ आंदोलन करण्यात आले होते. मुंबईत ही शिवसैनिकांनी आक्रमक होत,आशिष शेलार यांचे वादग्रस्तं होर्डिंग भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरच लावले आहे. या होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये नग्नं अवस्थेत दाखवण्यात आले असून त्यावर “आ’शिषे’ मे देख” अशी वाक्य लिहण्यात आली आहेत.

हेही वाचाः- कुलाब्यातील जेट्टी, प्रवासी वाहतूक टर्मिनलला सरकारची मान्यता

 शेलारांचं स्पष्टीकरण

“मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही. ती आमची संस्कृती, प्रथा, परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे त्यावर ठाम आहोत. त्या सवालातील भाषेमुळे जर कोणाचा अपमान झाला असेल तर त्याची क्षमाही मागू, क्षमा मागतो. पण सवाल आमचा जो आहे, तो स्पष्ट आहे, अफजल गुरूची बरसी मनवणारे, संविधानाचा अपमान करणारे, भारत तेरे तुकडे तुकडे म्हणणारे, शरजीलच्या समर्थनार्थ जाणारे, या सर्वांच्या मागे जो जो राजकीय पक्ष राहील, तो संविधानाच्या विरोधात उभा आहे. त्याला आम्ही खडे सवाल करत राहू. ” असं आशिष शेलार म्हणाले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा