Advertisement

कुलाब्यातील जेट्टी, प्रवासी वाहतूक टर्मिनलला सरकारची मान्यता

दक्षिण मुंबईतील (South Mumbai) रेडियो स्टेशनजवळ २०१६ साली प्रस्तावित असलेल्या जेट्टी व प्रवासी टर्मिनलला (Jetty and passenger terminal) राज्य सरकारनं (State Government) मंजुरी दिली आहे.

कुलाब्यातील जेट्टी, प्रवासी वाहतूक टर्मिनलला सरकारची मान्यता
SHARES

अलिबाग (Alibag), एलिफंटा (Elephanta) बेटापर्यंतचा प्रवास आता सुखकर होणार आहे. कारण, दक्षिण मुंबईतील (South Mumbai) रेडियो स्टेशनजवळ २०१६ साली प्रस्तावित असलेल्या जेट्टी व प्रवासी टर्मिनलला (Jetty and passenger terminal) राज्य सरकारनं (State Government) मंजुरी दिली आहे. तसंच, यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळं आता लवकरच प्रकल्पाच्या निविदा (Tender) काढण्यात येणार आहेत. 

राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यसंवर्धन व बंदरविकास मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh, Minister of Textiles, Fisheries and Seaport Development of the state) यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. प्रकल्प (Project) पूर्ण होण्यासाठी लागणारा अपेक्षित कालावधी २ वर्षांचा असून, या प्रकल्पाला वित्त विभागाकडून मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून (Maharashtra Maritime Corporation) लवकरच निविदा मागवण्यात येतील व प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

नवीन जेट्टी उभी राहिल्यानंतर अलिबाग आणि एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटी नवीन जेट्टीमधून धावणार आहेत. त्याशिवाय, इथं एक वेटिंग रूम आणि आधुनिक सुविधांसह एक नवीन टर्मिनलदेखील असेल, अशीही माहिती शेख यांनी दिली.

हेही वाचा - आर्थिक उत्पनाच्या कमतरतेमुळं महापालिकेची नोकरभरती बंद

या प्रकल्पासाठी भारतीय नौदल (Indian Navy), तटरक्षकदल (Coast Guard), पुरातत्व विभाग-मुंबई (Archaeological Department-Mumbai), मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust), महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण (Maharashtra Coast Guard Department Management Authority) या सर्व संस्थांच्या परवानग्या मिळाल्या असून, ही जेट्टी रेडिओ क्लबपासून सुमारे २०० मीटर अंतरावर बांधण्यात येणार आहे.

नवीन टर्मिनल इमारतीमध्ये पार्किंग (Parking) सुविधाही असणार आहे. या जेट्टीमध्ये एकूण ८ धक्के असणार आहेत. नौका मालकांसाठी १ धक्का राखीव असणार आहे. गेटवे ऑफ इंडियावर वर्षाला २६ लाखांपेक्षा अधिक जण नौका सफारीसाठी येत असतात. दरवर्षी ही संख्या १० टक्क्यांनी वाढते. याचा विचार करता सध्याची जेट्टी अपुरी पडत असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाकडून (Maharashtra Maritime Corporation) देण्यात आली.

नव्या टर्मिनल इमारतीमध्ये ५,०५० चौरस फुटांचं प्रतीक्षालय, १०० लोकांसाठी आसनव्यवस्था व एकाच वेळी १००० जणांना सामावून घेण्याची क्षमता असेल. नव्या जेट्टी व टर्मिनलमुळे रायगड व एलिफंटाकडे पर्यटकांचा ओघ वाढेल व पर्यटनास चालना मिळणार आहे.



हेही वाचा -

विजया रहाटकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

महापालिकेकडून बेस्टला १५०० कोटींची मदत



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा