Advertisement

महापालिकेकडून बेस्टला १५०० कोटींची मदत

महापालिकेनं अर्थसंकल्पात बेस्टला (BEST) आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी १५०० कोटींची मदत केली आहे

महापालिकेकडून बेस्टला १५०० कोटींची मदत
SHARES

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी (BMC Commissioner Praveen Singh Pardeshi) यांनी सन २०२०-२१ सालचा ३३,३४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प (Budget 2020) स्थायी समिती (Standing Committee) अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांना मंगळवारी सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक सुविधांसाठी महापालिकेनं (BMC) मदतीचा हात दिला आहे. त्याशिवाय, बेस्टला (BEST) आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे. 

गतवर्षी मुंबई महापालिकेनं बेस्टला कर्जाच्या परतफेडीसाठी मदत केली होती. २ हजार कोटींचं अनुदान महापालिकेनं (BMC) बेस्टला दिलं होतं. त्यानंतर, आता पुन्हा एकदा मदतीचा (Help) हात दिला आहे. यंदाच्या वर्षी आणखी १५०० कोटींचं अनुदान महापालिका देणार असल्याची अर्थसंकल्पात (Budget 2020) तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेनं बेस्टला या अनुदानासह काही अटीही घातल्या आहेत. बेस्ट प्रशासनाला बेस्टवरील कर्जाची परतफेड, भाडेतत्त्वावर नवीन बस, वेतन कराराचे दायित्व, आयटीएमएस (ITMS) व दैनंदिन खर्च भागवण्यासाठी या पैशांचा वापर करण्याची अट घातली आहे. बेस्टला हे अनुदान देताना उपक्रमाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी निर्बंध घालण्यात आलं आहेत.

बेस्टची आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी बस वाहतुकीवरील प्रतिकिमीचा खर्च १० ते १५ टक्क्यांनी कमी होणं आवश्यक आहे. बेस्ट बसच्या ताफ्यामध्ये मागील काही वर्षांत सर्वसामान्यांची गरज भागविण्यातकी वाढ झालेली नाही. त्यामुळं खासगी वाहनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम मुंबईवर झाला असून वाहतूककोंडी वाढून वायू आणि ध्वनिप्रदूषणात (Noise pollution) वाढ झाली आहे. कार्बन डाय ऑक्साइडच्या (Carbon dioxide) उत्सर्जनपातळीत होत असलेल्या वाढीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे, हे रोखणे आवश्यक आहे.

बेस्टचा सध्याचा प्रति किमीचा खर्च हा अंदाजे १३० रुपये आहे. भाडेतत्त्वावरील नवीन बसच्या (Private buses) वापरामुळं हा खर्च कमी होऊन ९५ रुपये प्रति किमी होणार आहे. सध्या २३१ बस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या असून मार्च २०२० पर्यंत भाडेतत्त्वावरील १२४० बस चालवण्यात येणार आहेत. त्यामुळं दररोज ४५ लाख प्रवाशांना सेवा देणं शक्य होणार आहे. मध्य वैतरणा धरणातून (Central Vaitaran Dam) दररोज २५ मेगावॉट वीजनिर्मिती (2 MW power generation) अपेक्षित असून, ही वीज मुंबईकरांसाठी बेस्टला (BEST) मिळणे अपेक्षित आहे. ती मिळाल्यास बेस्टचे आर्थिक स्थैय वाढवण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.हेही वाचा -

BMC Budget 2020: कोस्टल रोडसाठी २ हजार कोटींची तरतूद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांची धरपकडसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा