Advertisement

BMC budget 2020: कोस्टल रोडसाठी २ हजार कोटींची तरतूद

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सन २०२०-२१ सालचा ३३,३४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना मंगळवारी सादर केला.

BMC budget 2020: कोस्टल रोडसाठी २ हजार कोटींची तरतूद
SHARES

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सन २०२०-२१ सालचा ३३,३४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना मंगळवारी सादर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात कपात होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु प्रत्यक्षात मात्र अर्थसंकल्पात २,६४९ कोटी रुपयांची (८.६ टक्के) वाढ नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी ३०,६९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता.

हेही वाचा- महापालिका अर्थसंकल्प २०२०-२१ लाइव्ह अपडेट्ससाठी इथं क्लिक करा

यंदाच्या अर्थसंकल्पात महापालिकेने महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पासह रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई २०३० चे ध्येय साधण्यासाठी मुंबईला विकसित आणि आनंदी शहरात परिवर्तित करण्याच्या आमच्या संकल्पनेनुसार, सर्व नागरी सेवा अर्थसंकल्पातून उपलब्ध करुन देण्याचा आमचा मानस आहे. शहरांमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी प्रदान करण्याची क्षमता असते. फक्त तेव्हाच जेव्हा ते शहर घडवण्यात प्रत्येकाचा हातभार लागतो. जलद प्रवास, शुद्ध पाणी, दर्जेदार प्राथमिक शिक्षण, निरोगी शहर, ग्रीन गार्डन, रोजगार आणि व्यवसायासाठी अनुकूल शहर, सहभागी आणि सर्वसमावेशक कामकाज. अशा सर्व गोष्टींचा समावेश असलेला हा अर्थसंकल्प जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी नागरी सेवांचा निर्देशांक सुधारण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे, असं मत अर्थसंकल्प सादर करताना प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केलं.


पायाभूत सुविधा -

  • रस्ते व वाहतूक विभाग अंतर्गत २०२०-२१ मध्ये रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये कोस्टल रोडसाठी २००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूदीत २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१८ मध्ये कोस्टल रोडसाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 
  • अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये गोरेगाव-मुलुंड लिंक रोड साठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • २०२०-२१ मध्ये साधारण २८९ किमी रस्त्यांची सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे.
  • अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये रस्ते सुधारणीकरणासाठी १६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २०१९-२० च्या तरतुदीपेक्षा ९ टक्क्यांनी जास्त.

बेस्ट -

  • बेस्टसाठी अर्थसंकल्पात १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • ही रक्कम खालील कारणांसाठी वापरली जाईल;
  • १. कर्जाची परतफेड
  • २. वेतन व्यवस्थापनाबाबत आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे.
  • ३. आयटीएमएस प्रकल्पाची अंमलबजावणी.
  • २० किमी प्रति तासपासून ४० किमी प्रति तासापर्यंत प्रवासाचा वेग वाढवणे
  • रस्त्यांखालील क्षेत्र १० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वाढवणे
  • सार्वजनिक बस वाहतुकीमध्ये प्रवाश्यांचा वाटा १५ टक्क्यांवरून २५ टक्क्यांपर्यंत वाढविणे.

घनकचरा व्यवस्थापन -

  • दररोज ६७०० टीपीडी कचरा संकलित केला जातो. २०३० पर्यंत कचरा १८०० टीपीडी क्षमतेच्या एनर्जी प्लांटकडे वळवून, ५००० टिपीडी पर्यंत कमी करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. तसंच बांधकाम कचर्‍याचा पुनर्वापर करण्यासाठी १२०० टीपीडी क्षमतेचा एक प्लांट स्थापित करणे.
  • देवनार पशुवधगृहाचे नूतनीकरण, यंदाच्या अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद

पाणीपुरवठा-

  • सध्या ३८५० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. २०३० पर्यंत पाण्याची मागणी ५९१० एमएलडी होईल. पाण्याच्या मागणीतील वाढीची पूर्तता गरगाई प्रकल्प व पुनर्वापराने होईल.
  • १० बीओडी स्तरावर १००% सांडपाणी शुद्धीकरणाद्वारे परिपत्रक अर्थव्यवस्था आणि कमीतकमी ५०% पाण्याच्या पुनर्वापरामुळे मुंबईतील समुद्र, नद्या व तलाव स्वच्छ होतात.

आरोग्य व्यवस्था -

  • पशुवैद्यकीय आरोग्य पदासाठी अर्थसंकल्पात एकूण ३९ कोटींची तरतूद.
  • केईएम रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार, १०.०३ कोटी प्रस्तावित.
  • वांद्रे भाभा रुग्णालयासाठी २८७ कोटींची तरतूद.
  • राजावाडी रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी वसतिगृहासाठी १५.२२ कोटींची तरतूद.
  • कार्बन डाय ऑक्साइडच्या उत्सर्जन कमी करण्यासाठी पालिका रुग्णालयामध्ये ट्रायजनरेशन तंत्रज्ञान आणणार , ५ कोटींची तरतूद

पर्यटन, इतर -

  • पश्चिम उपनगरात कार्यरत महिलांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी ₹१० कोटींची तरतूद करण्यात आली आहे यामुळे महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर सुविधांनी युक्त वसतिगृह बनवण्यात येणार.
  • मुंबई महानगरपालिकेला मदत करण्यावर भर असलेल्या स्टार्टअप कल्पनांना मुंबई इनक्यूबेशन लॅबमार्फत आर्थिक मदत दिली जाईल. त्यासाठी मुंबई इनक्यूबेशन लॅबसाठी एकूण ₹१५ कोटींची तरतूद केली आहे.
  • मुंबई महानगरपालिकेने पर्यटनासाठी एक समर्पित विभाग तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे.  त्यातील दैनंदिन उपक्रम तज्ञ आणि मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंट्सद्वारे चालविले जातील. पर्यटन आणि हेरिटेजसाठी अर्थसंकल्पात ₹१८३.०३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा