Advertisement

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांची धरपकड

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधीतांनी (Navi mumbai international airport) पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी विमानतळाचं काम रोखण्याचं प्रयत्न केला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांची धरपकड
SHARES

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधीतांनी (Navi mumbai international airport) पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी विमानतळाचं काम रोखण्याचं प्रयत्न केला. आपल्या विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी विमानतळाचं काम सुरू असलेल्या वाघीवली परिसरात जोरदार आंदोलन केलं. अखेर पोलिसांना या प्रकरणी हस्तक्षेप करत आंदोलकांची (project affected people) धरपकड करावी लागली. 

आपल्या विविध मागण्यांसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधीतांकडून (Navi mumbai international airport) २३ जानेवारीपासून वाघीवली इथं आंदोलन सुरू आहे. परंतु आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम करणाऱ्या सिडकोकडून (cidco) या आंदोलनाची दखल घेण्यात येत नसल्याची आंदोलनकर्त्यांची भावना झाल्याने त्यांनी प्रकल्पाचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. 

प्रकल्पबाधीतांचं पुनर्वसन करण्याच्या नावाखाली सिडकोने (cidco) प्रकल्पबाधीतांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. अखिल भारतीय किसान सभा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन तीव्र झाल्याने पोलिसांना मध्यस्ती करत आंदोलकांची धरपकड करावी लागली.

या आंदोलनाचं नेतृत्व करणारे किसान सभेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे आणि प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अनिल पाटील यांना पोलिसांनी अटक केली. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा