Advertisement

माहुलवासीयांच्या मदतीला आदित्य ठाकरे

राष्ट्रीय हरीत लवाद यांनी दिलेल्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करुन या परिसरातील प्रदुषणाचे नियंत्रण करावे, अशा सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या आहेत..

माहुलवासीयांच्या मदतीला आदित्य ठाकरे
SHARES

प्रदूषणात गुदमरणार्‍या माहुलवासीयांच्या पुनर्वसनाकडे राज्य सरकार व पालिकेकडून वेळोवेळी दुर्लक्ष करण्यात आले. तत्कालीन  पयार्वरण मंत्री रामदास कदम यांनी ही माहुलमध्ये प्रदूषण असल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर  माहुल येथील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण विभागासह माहुल परिसरातील प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. राष्ट्रीय हरीत लवाद यांनी दिलेल्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करुन या परिसरातील प्रदुषणाचे नियंत्रण करावे, अशा सूचना मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या आहेत.

हेही वाचाः- मुंबईतील 'इतक्या' टॅक्सींना रुफलाइट इंडिकेटर

माहुल येथील वाढत्या प्रदुषणाचा परिणाम हा फक्त त्या भागापुरता मर्यादीत न राहता मुंबईतील इतर भागातही होत आहे. उद्योग आवश्यक आहेतच, पण त्याबरोबर पर्यावरणाचे रक्षणही आवश्यक आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय हरीत लवाद यांनी सूचना दिलेल्या आहेत. माहुल भागातील उद्योग हे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निकषांची पुर्तता करतात किंवा नाही याची पडताळणी होणे आवश्यक आहे. सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेश आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन, आयसीटीचे प्रा. जी. डी. यादव, एचपीसीएलचे व्ही. एस आगाशे, बीपीसीएलचे पी. व्ही. रवीतेज, निरीचे डॉ. तुहीन बॅनर्जी, सुधीर मल्होत्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचाः- राज्याच्या तिजोरीत खडखडाट, निधी अभावी ‘१ रुपयात आरोग्य तपासणी’ योजना गुंडाळणार

मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, यावेळी एचपीसीएल, बीपीसीएल यांच्या प्रतिनिधींनीही काही प्रश्न मांडले. रस्त्यांचा प्रश्न, पार्कींगचा प्रश्न आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. यावर संबंधीत विभागांशी चर्चा करुन हे प्रश्न सोडविण्यात येतील, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. या आधीही आदीत्य माहुलवासीयांच्या मदतीसाठी धावून गेले होते. प्रदूषणाने वेढलेल्या माहुल गावातूल नागरिकांची सुटका करावी. अशी मागणी तेथील नागरिक वेळोवेळी करत होते. मात्र पालिका आणि राज्यसरकारने त्या कडे कानाडोळा केला होता. अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्यानंतर त्या आंदोलनाची दखल आदीत्य ठाकरे यांनी घेतली. ठाकरे यांनी मध्यस्थीकरत गोराई येथील म्हाडाची ३०० घरे माहुलवासीयांना देण्याची मागणी केली  होती.

हेही वाचाः- 'या' सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य शासनानाकडून एसटीला २२० कोटी रुपये

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा