Advertisement

'या' सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य शासनानाकडून एसटीला २२० कोटी रुपये

या सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य शासनानं २२० कोटी रुपये एसटी महामंडळाला रोखीनं दिले आहेत.

'या' सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य शासनानाकडून एसटीला २२० कोटी रुपये
SHARES

एसटीनं (MSRTC) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळामार्फत (Maharashtra State Transport Corporation) प्रवासभाडे सवलत (Travel concessions) देण्यात येते. या सवलतीच्या प्रतिपूर्तीपोटी राज्य शासनानं २२० कोटी रुपये एसटी महामंडळाला रोखीनं दिले आहेत. त्यामुळे महामंडळावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता आहे.

एसटी महामंडळाकडून (MSRTC) विविध प्रवासीवर्गाला प्रवास भाड्यात ३३ टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासन एसटी महामंडळाला करत असते. ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या ४ महिन्यांच्या कालावधीतील शिल्लक सवलत मूल्यांच्या रकमेपैकी ४७८ कोटी ९५ लाख ७४ हजार २२२ रुपये रोखीने वितरित करण्याचा प्रस्ताव महामंडळानं राज्य शासनास (State governance) सादर केला होता.

त्यानुसार, एसटी महामंडळाला २२० कोटी रुपये मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं एसटीवरील आर्थिक भार कमी होताच थकित बिले, वेतन इत्यादी कामे मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे. एसटी महामंडळानं सलग २५ वर्षे विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांना १५ हजार रुपये रोख, शाल व २५ वर्षे सुरक्षित सेवा दिल्याचा बिल्ला दिला जाणार असल्याची माहिती महामंडळानं दिली.हेही वाचा -

राज्याच्या तिजोरीत खडखडाट, निधी अभावी ‘१ रुपयात आरोग्य तपासणी’ योजना गुंडाळणार

कुलाब्यातील जेट्टी, प्रवासी वाहतूक टर्मिनलला सरकारची मान्यतासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा