Advertisement

राज्याच्या तिजोरीत खडखडाट, निधी अभावी ‘१ रुपयात आरोग्य तपासणी’ योजना गुंडाळणार

शिवसेनेने शिवभोजन थाळी सुरू केल्याने गरिबांसाठी असलेली आरोग्य योजना अडचणीत आली आहे.

राज्याच्या तिजोरीत खडखडाट, निधी अभावी ‘१ रुपयात आरोग्य तपासणी’ योजना गुंडाळणार
SHARES

‘केवळ १ रुपयात आरोग्य तपासणी’ ही शिवसेनेच्या वचनाम्यातील योजना तिजोरीच्या गंभीर स्थितीमुळे गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर  शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी केली. त्यानंतर १० रुपयांत शिवभोजन थाळी आली. स्टॉल चालवणाऱ्यांना थाळीमागे ४० रुपये अनुदान  दिले. यामुळे तिजोरीवर अतिरिक्त भार आला. राज्यावर सध्या सुमारे ६ लाख कोटी कर्जाचा डोंगर आहे. त्यातच शिवसेनेने शिवभोजन थाळी सुरू केल्याने गरिबांसाठी असलेली आरोग्य योजना गुंडाळावी लागणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

 हेही वाचाः-विजया रहाटकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाथी घेतल्यानंतर शिवसेनेने वचननाम्यातून करण्यात आलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली.  ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथम शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी केली. त्यानंतर १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली.  यात स्टॉल चालवणाऱ्याना थाळीमागे ४० रुपये अनुदान ही दिले. ठाकरेंच्या या योजनांना सर्वसामान्यांकडून ही चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र या योजनांचा भार हा सरकारच्या तिजोरीवर आला. राज्यावर सध्या सुमारे ६ लाख कोटी कर्जाचा डोंगर आहे. त्यात शिवसेनेने शिवभोजन थाळी सुरू केल्याने गरिबांसाठी असलेली आरोग्य योजना अडचणीत आली आहे.

 हेही वाचाः-महापालिकेकडून बेस्टला १५०० कोटींची मदत

आजारावर निदानासाठी केवळ १ रुपयात आरोग्य तपासणी ही योजना तिजोरीत खडखडाट असल्याने गुंडाळण्याची वेळ आघाडी सरकारवर आली. सेनेच्या वचननाम्यात ही योजना असून राष्ट्रवादीची इच्छा असूनही निधीअभावी योजनेला ग्रहण लागले. उद्धव ठाकरेंची ही संकल्पना खूपच चांगली असून ती राबवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचीसुद्धा तीव्र इच्छा आहे. आरोग्यमंत्री म्हणून ही योजना सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र, निधीची कमतरता असल्याने तूर्त ती राबवली जाऊ शकत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचाः-मुंबईतील 'इतक्या' टॅक्सींना रुफलाइट इंडिकेटर

 


 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा