Advertisement

मुंबईतील 'इतक्या' टॅक्सींना रुफलाइट इंडिकेटर

पहिल्या टप्प्यात मुंबईतील टॅक्सींना 'रुफलाइट इंडिकेटर' (Roof Light indicator) बसवण्यात आले आहेत.

मुंबईतील 'इतक्या' टॅक्सींना रुफलाइट इंडिकेटर
SHARES

रस्त्यावरून धावणारी टॅक्सी (Taxi) रिकामी आहे की नाही, हे प्रवाशांना (Passengers) आता सहज कळणार आहे. कारण, मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या टपावर ३ रंगांचे दिवे (Three Color light) लावण्यात येणार असून परिवहन विभागाच्या (Trasnport Department) या नव्या नियमाची अंमलबजावणी (Implementation) १ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार होती. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात मुंबईतील ४० पेक्षा अधिक टॅक्सींना 'रुफलाइट इंडिकेटर' (Roof Light indicator) बसवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

टॅक्सीनं (Taxi) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काळ्या-पिवळ्या टॅक्सींची उपलब्धता समजावी, यासाठी हा प्रयोग करण्यात येत असून, १ फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर (experimental basis) मुंबईतील २०० काळ्या-पिवळ्या टॅक्सींवर 'रुफलाइट इंडिकेटर' (Roof Light indicator) बसवावेत, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं केली होती. त्यानुसार, नव्यानं येणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सींना ही सुविधा उपलब्ध केली जात आहे.

अंधेरी आरटीओंतर्गत (Andheri RTO) ७ आणि वडाळा, ताडदेव आरटीओंतर्गत (Wadala, Tardeo RTO) ३३ पेक्षा जास्त टॅक्सींना 'रुफलाइट इंडिकेटर' बसविण्यात येत आहेत. एकच इंडिकेटर बसवल्यानंतर टॅक्सी उपलब्ध असल्यास हिरवा रंग प्रकाशित होणार आहे. सेवा बंद असल्यास पांढरा रंग आणि टॅक्सीत प्रवासी असल्यास ती उपलब्ध नसल्याचा लाल रंग प्रकाशित होणार आहे.

'रुफलाइट इंडिकेटर' ही सुविधा प्रवाशांसाठी सोयीची ठरते का, टॅक्सीचालकांकडूनही त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का याची पाहणी केली जाणार आहे. प्रथम नवीन टॅक्सींना रुफलाइट इंडिकेटर बसवण्याचा जरी निर्णय झाला असला तरीही जुन्या टॅक्सींनाही सुविधा उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी चालकांनी पुढाकार घेतल्यास आरटीओ ही सुविधा जुन्या टॅक्सींसाठीही त्वरित उपलब्ध करण्याची मंजुरी देण्यात येणार असल्याचं परिवहन आयुक्त कार्यालयाचे प्रवक्ते व आरटीओ अधिकारी अभय देशपांडे यांनी म्हटलं.



हेही वाचा -

कसोटीमध्ये पृथ्वी शॉचं पुनरागन; भारतीय संघाची घोषणा

आर्थिक उत्पनाच्या कमतरतेमुळं महापालिकेची नोकरभरती बंद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा