Advertisement

कसोटीमध्ये पृथ्वी शॉचं पुनरागन; भारतीय संघाची घोषणा

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भारत (India) यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी (Test Match) भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे.

कसोटीमध्ये पृथ्वी शॉचं पुनरागन; भारतीय संघाची घोषणा
SHARES

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध भारत (India) यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी (Test Match) भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय कसोटी संघात मुंबईकर पृथ्वी शॉचं (Prithvi Shaw) पुनरागमन झालं आहे. टी-२० (T-20) मालिकेत पायाला झालेल्या दुखापतीमुळं (Injury) सलामीवीर फलंदाज व हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं संघातून माघार घेतली आहे. त्यामुळं त्याला वनडे (ODI) व कसोटी मालिकेत स्थान देण्यात आलेलं नाही. 

भारतीय निवड समितीनं (Selection Committee of India) कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ३ वन-डे (ODI) सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ २ कसोटी (Test) सामन्यांची मालिका खेळणार आहे. मुंबईकर पृथ्वी शॉने कसोटी संघात पुनरागमन केलेलं आहे. मात्र, या संघात गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला (K.L. Rahul) संघात स्थान मिळालेलं नाही आहे.

भारत अ (India-A) संघाकडून न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यात आश्वासक कामगिरी करणाऱ्या शुभमन गिल, हनुमा विहारी यांनीही कसोटी संघातलं स्थान कायम राखलं आहे. त्याचप्रमाणं जलद गोलंदाज नवदीप सैनीनंही कसोटी संघात स्थान मिळवलं आहे. निवड समितीनं इशांत शर्मालाही भारतीय संघात संधी दिले आहे. परंतु, इशांत संघात खेळणार की नाही हे त्याच्या फिटनेस टेस्टवर अवलंबून असणार आहे.

भारतीय संघ :

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा.हेही वाचा -

येतो का पक्षात? जेव्हा राज ठाकरे स्वत:च देतात आॅफर

आर्थिक उत्पनाच्या कमतरतेमुळं महापालिकेची नोकरभरती बंदRead this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा