Advertisement

येतो का पक्षात? जेव्हा राज ठाकरे स्वत:च देतात आॅफर

दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी एखाद्याला जाहीरपणे पक्षात येण्याची आॅफर दिल्याचं मात्र तुम्ही कधी ऐकलं नसेल. पण पुण्यात मात्र असा प्रसंग घडला आहे.

येतो का पक्षात? जेव्हा राज ठाकरे स्वत:च देतात आॅफर
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांचं व्यक्तिमत्व, विचार आणि भाषणशैलीने आकर्षित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला असेल, परंतु दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी एखाद्याला जाहीरपणे पक्षात येण्याची आॅफर दिल्याचं मात्र तुम्ही कधी ऐकलं नसेल. पण पुण्यात मात्र असा प्रसंग घडला आहे. 

हेही वाचा- मनसेच्या मोर्चाचा मार्ग ठरला, ‘या’ मार्गावरून घुसखोरांविरूद्ध करणार आंदोलन

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झील संस्था आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी इंक अलाइव्ह या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, व्यंगचित्रकार चारूहास पंडित, जयेश काटकर इ. उपस्थित होते. राज ठाकरे (raj thackeray) यांच्या अगोदर व्यंगचित्रकार संजय मिस्त्री यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. संजय मिस्त्री यांनी शायरीचा आधार घेऊन कलेचं महत्त्व विषद केलं.

संजय मिस्त्री यांच्यानंतर राज ठाकरे (raj thackeray) मनोगतासाठी उभे राहिले. भाषणाच्या सुरुवातीलाच ‘संजू तू हल्ली बरा बोलतो, येतो का पक्षात?’असं  राज ठाकरे यांनी व्यासपीठावरुन म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. राज ठाकरे यांनी यावेळी कलेचंही महत्त्व पटवून दिलं. ‘प्रत्येक व्यक्तीमध्ये एक वेगळी कला असते. ती चित्रकलाच असली पाहिजे असे नाही, पण ती कला प्रत्येकाने जोपासली पाहिजे. त्यामुळे शिक्षणाला डिग्री लागते. पण, कलेला कोणत्याही प्रकाराची डिग्री लागत नाही. माझ्याविषयी सांगायचं झाल्यास मला राजकीय व्यंगचित्र शिकायचं होतं. त्यामुळे मी मधूनच शिक्षण सोडलं आणि जे. जे. आर्ट ऑफ स्कूलमध्ये (j j school of arts) व्यंगचित्र शिकलो. त्यामुळे माझ्याकडे कोणत्याही प्रकाराची डिग्री नाही आणि मला कोणीही डिग्री बद्दल आता पर्यंत विचारलं नाही.’ असं राज म्हणाले.

हेही वाचा- कुणाल कामराला घ्यायचाय राज ठाकरेंसोबत पंगा, लाच देण्याची आॅफर

चित्रकलेला मरण नसून त्यामुळे शिक्षकाने विद्यार्थीमधील कला हेरली पाहिजे. त्यांच्या मधील कला वाढविण्यासाठी प्रयत्न देखील केले पाहिजे. राज्य सरकार जेव्हा चित्रकला हा विषय ऑप्शनला टाकते, तेव्हा अशा संस्था उभा राहायला पाहिजे. यामुळे विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

आपण खास या कार्यक्रमासाठी कोणतंही काम नसताना पुण्यात आलो असल्याचंही त्यांनी सांगितलं.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा