Advertisement

कुणाल कामराला घ्यायचाय राज ठाकरेंसोबत पंगा, लाच देण्याची आॅफर

टिव्ही पत्रकार अर्णब गोस्वामीसोबत पंगा घेणारा स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा (comedian kunal kamra) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने चक्क ​मनसे अध्यक्ष राज ठाकरे​​​ (mns chief raj thackeray) यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कुणाल कामराला घ्यायचाय राज ठाकरेंसोबत पंगा, लाच देण्याची आॅफर
SHARES

टिव्ही पत्रकार अर्णब गोस्वामीसोबत पंगा घेणारा स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा (comedian kunal kamra) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

काही दिवसांपूर्वी काॅमेडियन कुणाल कामरा याने कुणाल कामरा (comedian kunal kamra) आणि अर्णब गोस्वामी (journalist arnab goswami) दोघेही मुंबई-लखनऊ विमान प्रवासात एकत्र होते. त्यावेळी कुणाल कामराने अर्णबच्या आसनाजवळ जात त्याच्या पत्रकारितेच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर इंडिगोसह ४ विमान कंपन्यांनी कुणाल कामराच्या विमान प्रवासावर बंदी आणली.  

हेही वाचा- मनसेच्या मोर्चाचा मार्ग ठरला, ‘या’ मार्गावरून घुसखोरांविरूद्ध करणार आंदोलन

त्यावर डीजीसीए (dgca) सीएआर नियमांचं उल्लंघन करत मनमानीपणे विमानप्रवासावर बंदी घालून मानसिक त्रास दिल्याबद्दल कुणाल कामराकडून इंडिगो एअरलाइन्सला २५ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस पाठवण्यात आली आहे. 

हा सगळा वादविवाद सुरू असताना कुणाल कामराने (comedian kunal kamra) आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांना वडापावची ‘लाच’ (bribe) देण्याची आॅफर दिली आहे. ही आॅफर त्याने आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी देऊ केली आहे. कुणाल कामराचा 'शट अप या कुणाल' (shut up ya kunal ) हा शो सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध आहे. या शोच्या माध्यमातून कुणाल कामरा वेगवेगळ्या व्यक्तींसोबत संवाद साधतो. आतापर्यंत कुणालने या शो मध्ये पत्रकार रवीश कुमार (ravish kumar), जावेद अख्तर, योगेंद्र यादव, कन्हैय्याकुमार यांची मुलाखत घेतली होती.

याच शोसाठी कुणालने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. यासाठी त्यांनी राज ठाकरेंना एक पत्र लिहिून ट्विटरवर टाकलं आहे. तसंच राज ठाकरे यांच्या दादर येथील निवासस्थानाबाहेरील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पत्रातून कुणाल म्हणतो, माझा अभ्यास पूर्ण झाला आहे. तुम्हाला किर्ती महाविद्यालयाजवळचा (kirti wada pav) वडापाव आवडतो हे मला ठाऊक झालं आहे. हा वडापाव मी तुम्हाला लाच म्हणून देऊ करेन. पण त्यासाठी तुम्हाला माझ्या कार्यक्रमात येण्यासाठी वेळ द्यावी लागेल, अशी विनंती कुणालने या पत्रातून केली आहे.

हेही वाचा- मुंबईकरांवर आणखी वीजदरवाढ नको, राज ठाकरेंचं विद्युत नियामक आयोगाला पत्र

आता राज ठाकरे (raj thackeray) कुणालच्या या पत्राची दखल घेऊन त्याला मुलाखत देतील का? हाच खरा प्रश्न आहे. जर राज ठाकरे यांनी कुणालला मुलाखत द्यायची ठरवल्यास कुणालची काय अवस्था होईल, असा प्रश्नही राज ठाकरे समर्थकांना पडला आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा