Advertisement

महापौरांकडून स्वीकृत नगरसेवकांची घोषणा

यावर्षी मुंबई महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांची संख्या जास्त आली आहे.

महापौरांकडून स्वीकृत नगरसेवकांची घोषणा
SHARES

अखेर मुंबई महापालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) नवनिर्वाचित महापौर रितू तावडे (ritu tawde) यांनी बुधवारी सर्व 10 स्वीकृत नगरसेवकांची (corporate) घोषणा केली आहे.

बंद लिफाफ्यात दहा स्वीकृत नगरसेवकांची नावे आणण्यात आली होती. रितू तावडे यांनी सर्वपक्षीय स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली.

यावर्षी मुंबई (mumbai) महापालिकेतील पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांची संख्या जास्त आली आहे.

भाजपच्या वाट्याला 4, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (shiv sena) 2 तर काँग्रेसला 1 स्वीकृत नगरसेवकपद मिळाले आहे.

भाजपच्या चार स्वीकृत नगरसेवकांमध्ये प्रतीक मधुसदन कर्पे, प्रवीण छेडा, नितेश सिंह, कमलाकर दळवी यांचा समावेश आहे.

तसेच शिवसेनेकडून राज सुर्वे, उमेश माने यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माधुरी मांजरेकर, साईनाथ दुर्गे, कैलास पाठक या तिघांची वर्णी लागली आहे.

काँग्रेसकडून वीरेंद्र चौधरी हे एकमेव स्वीकृत नगरसेवक म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. मनसेला मात्र एकही स्वीकृत नगरसेवक पद मिळाले नाही.



हेही वाचा

मुंबईत AI आणि IoT आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली लागू होणार

देवनार वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प जूनपर्यंत सुरू होणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा