Advertisement

AAP पाठोपाठ महाराष्ट्रातही १०० युनिट वीज मोफत…

आपने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच (manifesto) महाराष्ट्रातही १०० युनिटपर्यंत मोफत वीज देता येऊ शकते, असा दावा ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

AAP पाठोपाठ महाराष्ट्रातही १०० युनिट वीज मोफत…
SHARES

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (delhi election) आम आदमी पक्षाला (AAP) मिळालेल्या दणदणीत विजयाने प्रेरित होकर महाराष्ट्र सरकार (maharashtra government) ने देखील 'आप'च्या पावलांवर पाऊल ठेवण्याचे मनसुबे रचले आहेत. आपने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच (manifesto) महाराष्ट्रातही १०० युनिटपर्यंत मोफत वीज देता येऊ शकते, असा दावा ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या फुकटच्या सवलतीवर टीका केली.

हेही वाचा- यापुढं २ अपत्ये असणाऱ्यांनाच सवलती, शिवसेनेनं आणलं विधेयक

दिल्लीमध्ये सध्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (delhi cm arvind kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचं सरकार दिल्लीतील रहिवाशांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत (free electricity) देत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात तर आपने २०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचं आश्वासन दिलं आहे. वीज, पाणी आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे दिल्लीकरांनी आपला पुन्हा एकदा सत्तेत बसवलं आहे.

त्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत (nitin raut) यांनी देखील राज्यातील जनतेला मोफत वीज देता येईल का? याचा विचार सुरू केला आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, राज्यात वीज व्यवस्थापन हा विषय महत्त्वाचा आहे. खासगी वीजनिर्मिती कंपन्यांपेक्षा सरकारी वीजनिर्मितीचा खर्च का जास्त आहे, हा प्रश्नच आहे. वीजनिर्मितीचा खर्च कमी झाल्यास आणि वीज गळती रोखता आल्यास ग्राहकांना स्वस्त दरांत वीज देता येईल आणि गरिबांना १०० युनिटपर्यंत मोफत वीज (free electricity in maharashtra) देता येईल. त्याच अनुषंगाने राज्यात वीज गळती का आणि कशी होते, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय या चौकशीसाठी प्रधान सचिवांच्या देखरेखीखाली विशेष पथक स्थापन करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली. 

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी राऊत यांच्या भूमिकेचे समर्थन केलं. मात्र, मोफत विजेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याबाबतचं वृत्त वाचलं, पण असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. 

हेही वाचा- आता देशात जन की बातच चालणार- उद्धव ठाकरे

राज्यात मोफत वीज द्यायची झाल्यास त्यासाठी वर्षाला अंदाजे ७ हजार १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 'महावितरण' आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती पाहता हा भार कोण सोसणार, हाच सर्वात मोठा प्रश्न असेल. 

उपमुख्यमंत्र्यांच्या विधानाकडे राऊत यांचं लक्ष वेधलं असता, अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांना राज्याच्या आर्थिक स्थितीची काळजी असणं स्वाभाविक आहे, परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वच मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊनच मोफत विजेचा निर्णय अभ्यासांती घेतला जाईल, असं राऊत यांनी सांगितलं.

मोफत विजेच्या घोषणेवरून महाविकास आघाडी सरकारमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा