Advertisement

आता देशात जन की बातच चालणार- उद्धव ठाकरे

आता देशात मन की बात नव्हे, तर जन की बात चालणार हे दिल्लीतील जनतेने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी दिल्लीतील विधानसभा (delhi vidhan sabha election 2020) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली.

आता देशात जन की बातच चालणार- उद्धव ठाकरे
SHARES

आता देशात मन की बात नव्हे, तर जन की बात चालणार हे दिल्लीतील जनतेने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी दिल्लीतील विधानसभा (delhi vidhan sabha election 2020) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केलं.

हेही वाचा- राज ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, शरद पवारांचा टोमणा

भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका करताना उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) म्हणाले, तथाकथीत राष्ट्रीय विचारांचं सरकार दिल्लीत असून आणि त्यानी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ूसमोर टिकाव लागला नाही. बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानीक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करुनसुद्धा अरविंद केजरीवाल यांना ते पराजीत करू शकले नाहीत.


  • देशात मन की बात नव्हे, तर जन की बात चालणार
  • भ्रमाचा भोपळाही दिल्लीकर मतदारांनी फोडला
  • विकास करणाऱ्याच्या मागे जनता उभी राहिली
  • सर्व ताकद पणाला लावूनही झाडूसमोर टिकाव लागला नाही

ते पुढं म्हणाले, दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे ऊभी राहिली आणि जनतेने लोकशाही वरचा भरोसा कायम असल्याचं दाखवलं. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळाही दिल्लीकर मतदारांनी फोड़ला. दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसैनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो, अशा शब्दांत ठाकरे यांनी केजरीवाल यांचं कौतुक केलं.

हेही वाचा- देशद्रोही भाजपला दिल्लीकरांनी नाकारलं- नवाब मलिक

दरम्यान, शिवसेना आमदार अनिल परब ( shiv sena mla anil parab) म्हणाले,  महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाच्या माध्यमातून शिवसेनेने देशाच्या राजकारणाला वेगळं वळण दिलं आहे. त्याचेच परिणाम दिल्ली विधानसभा निवडणुकीत (delhi vidhan sabha election 2020) दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांसोबतच संपूर्ण देशभरातून भाजपचे दिग्गज नेते दिल्लीत प्रचारासाठी गेले होते. तरीही दिल्लीसारख्या छोट्या राज्यावर भाजपला विजय मिळवता आला नाही. दिल्लीतील जनतेने पुन्हा एकदा विकासालाच मत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना म्हणजेच भाजपाला नाकारलं आहे. हा पराभव म्हणजे एकप्रकारे भाजपच्या अहंकाराचा पराभव आहे, अशा शब्दांत भाजपवर टीका केली. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा