Advertisement

राज ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, शरद पवारांचा टोमणा

राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी लगावला आहे.

राज ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, शरद पवारांचा टोमणा
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी नुकताच बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून देण्याच्या मागणीसाठी प्रचंड मोर्चा काढला होता. या मोर्चाची राज्यभरात चर्चा सुरू असताना राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी लगावला आहे.  

मनसेच्या भव्य मोर्चानंतर मुंबईतील आझाद मैदानात ९ फेब्रुवारी रोजी केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरे (raj thackeray) यांनी दगडाचं उत्तर दगडाने आणि तलवारीचं उत्तर तलवारीने दिलं जाईल, असा इशारा घुसखोरांना तसंच सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात मोर्चा-आंदोलन काढणाऱ्यांना दिला होता. त्याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न शरद पवार (ncp chief sharad pawar) यांना पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. 

हेही वाचा- देशद्रोही भाजपला दिल्लीकरांनी नाकारलं- नवाब मलिक

त्यावर शरद पवार (sharad pawar) यांनी उत्तर दिलं की, काही लोकांची वक्तव्य गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते जे बोलून गेले ते गेले. अशा नेत्यांची भाषण लोकं फक्त बघायला आणि ऐकायलाच येतात. अशा प्रकारच्या भाषणांची फार नोंद घ्यायची नसे, असं पवार म्हणाले.  

दिल्ली विधानसभा निवडणूक (delhi vidhan sabha election 2020) निकालावर प्रतिक्रिया देताना, ते म्हणाले, तर, दिल्ली हे देशातील एक वेगळं शहर आहे. तिथं अनेक राज्यांतील लोकं आहेत. त्यामुळं दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा दिल्लीपुरता मर्यादित नाही. बदलाचं वातावरण देशभरात आहे. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून ती आता थांबणार नाही,' असा दावाही शरद पवार यांनी केला.

राज ठाकरे यांनी पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात गिरगाव हिंदू काॅलनी ते आझाद मैदान असा मोर्चा (mns rally) काढला होता. या मोर्चासाठी राज्यभरातून अंदाजे दीड लाख मनसैनिक आल्याचं म्हटलं जात आहे. या मोर्चाद्वारे राज ठाकरे यांनी पक्षाचं शक्तीप्रदर्शनही केलं. पक्षाचा झेंडा भगवा केल्यानंतर तसंच मशिदीवरील भोंगे, हिंदुत्व (hindutva) अशा मुद्द्यांना हात घालत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे त्यांच्या मोर्चाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या मोर्चाद्वारे राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या सीएए (caa) आणि एनआरसी (nrc) कायद्याला उघडपणे पाठिंबा दाखवला होता. 


हेही वाचा-

 मुंबई भाजपला मिळणार नवा अध्यक्ष? 'या' नेत्यांची नावे चर्चेत

 दिल्लीकरांनी भाजपचा अहंकार उतरवला- अनिल परबRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा