Advertisement

दिल्लीकरांनी भाजपचा अहंकार उतरवला- अनिल परब

दिल्लीकरांनी भाजपचा (bjp) अहंकार उतरवल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते आमदार अनिल परब (anil parab) यांनी दिली.

दिल्लीकरांनी भाजपचा अहंकार उतरवला- अनिल परब
SHARES

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (delhi vidhan sabha election 2020) भाजपला धूळ चारून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (arvind kejriwal) यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष (aam aadmi party) तिसऱ्यांदा विजयाची पताका फडकवणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. दिल्लीत भाजपचा स्पष्ट पराभव होणार असल्याचं दिसू लागताच शिवसेनेने (shiv sena) भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. दिल्लीकरांनी भाजपचा (bjp) अहंकार उतरवल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते आमदार अनिल परब (anil parab) यांनी दिली.  

हेही वाचा- ‘आप’च्या मुंबई कार्यालयातही जल्लोष, विजयाच्या हॅटट्रीकमुळे कार्यकर्ते खूष

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेत (delhi vidhan sabha election 2020) ६३ जागांवर आप आणि ७ जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. २०१५ निवडणुकीच्या तुलनेत यंदा आपच्या ४ जागा घटून भाजपच्या ४ जागा वाढल्याचं दिसत आहे. दिल्ली विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी ३६ जागांची आवश्यकता असते. त्यादृष्टीकोनातून आपने स्पष्ट बहुमत मिळवल्याचं दिसत आहे. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार अनिल परब ( shiv sena mla anil parab) म्हणाले,  महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाच्या माध्यमातून शिवसेनेने देशाच्या राजकारणाला वेगळं वळण दिलं आहे. त्याचेच परिणाम दिल्ली विधानसभा निवडणुकीत (delhi vidhan sabha election 2020) दिसून येत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांसोबतच संपूर्ण देशभरातून भाजपचे दिग्गज नेते दिल्लीत प्रचारासाठी गेले होते. तरीही दिल्लीसारख्या छोट्या राज्यावर भाजपला विजय मिळवता आला नाही. दिल्लीतील जनतेने पुन्हा एकदा विकासालाच मत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना म्हणजेच भाजपाला नाकारलं आहे. हा पराभव म्हणजे एकप्रकारे भाजपच्या अहंकाराचा पराभव आहे. 

हेही वाचा-मुंबई भाजपला मिळणार नवा अध्यक्ष? 'या' नेत्यांची नावे चर्चेत

ते पुढं म्हणाले, राजकारणात चढ-उतार सुरूच असतात. पण फक्त आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय इतर कुणीच राज्य करू शकत नाही. हा अहंकार आहे. जो लोकं उतरवतात. भाजपच्या हातून आता अनेक राज्यं निसटली आहेत. या निवडणुकीत देशद्रोहाचा मुद्दा गाजला. पण देशद्रोहाची व्याख्या कोण्या एकाने ठरवून चालत नाही. ती लोकांनीही मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे, हे त्यांनी दिल्लीत दाखवून दिलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा