Advertisement

‘आप’च्या मुंबई कार्यालयातही जल्लोष, विजयाच्या हॅटट्रीकमुळे कार्यकर्ते खूष

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (delhi vidhan sabha election 2020) अंतिम निकालांमध्ये आम आदमी पक्षाने विजयाची हॅटट्रीक नोंदवत भाजपाचा मोठा पराभव केला आहे.

‘आप’च्या मुंबई कार्यालयातही जल्लोष, विजयाच्या हॅटट्रीकमुळे कार्यकर्ते खूष
SHARES

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (delhi vidhan sabha election 2020) अंतिम निकालांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने विजयाची हॅटट्रीक नोंदवत भाजपाचा मोठा पराभव केला आहे. या निकालांमुळे दिल्लीतील कार्यकर्त्यांसोबतच ‘आप’चे मुंबईतील कार्यकर्तेही खूष झाले आहेत. त्यांनी ‘आप’च्या अंधेरीतील कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन सुरू केलं आहे.

 

संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभा (delhi vidhan sabha election 2020) निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर होत आहे. मतमोजणीचे अंतिम निकाल अजून हाती लागले नसले, तरी ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (aam aadmi party) ६३ जागांवर आघाडी घेत स्पष्ट बहुमत मिळवल्याचं स्पष्ट होत आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज खरे ठरवत आप दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक नोंदवत असल्याने ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करायला सुरूवात केली आहे.  

मुंबईच्या अंधेरी, चकाला परिसरात आम आदमी पक्षाचं (aam aadmi party) कार्यालय आहे. जसजसे निकालाचे कल हाती येऊ लागले, तसतसा आपच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह देखील वाढू लागला. एक एक करत कार्यकर्ते पक्ष कार्यालयात जमायला लागले. विजयाच्या सेलिब्रेशनसाठी ढोल ताशे मागवण्यात आले. यानंतर ढोल ताशांच्या ठेक्यावर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. यावेळी मिठाई देखील वाटण्यात आली. या सेलिब्रेशनला आपच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali damania) देखील उपस्थित होत्या. 

अंतिम निकालांमध्ये आपला ६३ जागा, भाजपला ०७ जागा आणि काँग्रेसला ० जागा मिळतील, असं दिसून येत आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा