Advertisement

मुंबई भाजपला मिळणार नवा अध्यक्ष? 'या' नेत्यांची नावे चर्चेत

येणाऱ्या मुंबई महापालिका (bmc election 2022) निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने पक्षाचा मुंबई अध्यक्ष (bjp mumbai president) बदलण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई भाजपला मिळणार नवा अध्यक्ष? 'या' नेत्यांची नावे चर्चेत
SHARES

येणाऱ्या मुंबई महापालिका (bmc election 2022) निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने पक्षाचा मुंबई अध्यक्ष (bjp mumbai president) बदलण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नाही, तर नवा मुंबई अध्यक्ष मराठी असावा याकडेही कटाक्षाने लक्ष दिलं जात आहे. यामुळे भाजपच्या वर्तुळात अनेक नेत्यांनी अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात केल्याची चर्चा आहे. 

येत्या १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई इथं महाराष्ट्र भाजपाचं राज्यस्तरीय अधिवेशन (adhivseshan) होत आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (j. p.nadda)यांच्या हस्ते होणार आहे. हे अधिवेशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली होईल. या अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis), विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (praveen darekar), एकनाथ खडसे (eknath khadase), सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे (pankaja munde), राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासहीत भाजपचे पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा- महापालिकेला लागले 'इंदूर पॅटर्न'चे वेध

मुंबईसहीत राज्यातील इतर विभागांमध्ये वाॅर्ड अध्यक्ष, जिल्हा अध्यक्षांच्या निवडीचं काम सुरू आहे. याचदरम्यान सध्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना पुन्हा एकदा संधी देण्याची मागणी देखील पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. सद्यस्थितीत मुंबईतील मलबार हिल येथील आमदार आणि नामांकीत बिल्डर मंगलप्रभात लोढा (mangal prabhat lodha) हे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत. लोढा हे मराठी नसल्याने तसंच त्यांची व्यावसायिक अडचण पक्षासाठी गैरसोईची ठरत असल्याने हा बदल करण्याचं पक्षाने ठरवलं आहे.

याआधी भाजप आमदार आशिष शेलार (ashish shelar) भाजपाचे मुंबई अध्यक्ष होते. त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांनी आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे मंगलप्रभात लोढा यांच्याकडे सोपवली होती. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान आक्रमक स्वभावाच्या अशिष शेलार यांनी शिवसेना नेत्यांना चांगलीच टक्कर दिली होती. शेलार आणि शिवसेना नेत्यांनी (shiv sena) आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठलं होतं.

पण त्यानंतर लोढा यांच्याकडे अध्यक्षपद आल्यापासून मुंबई भाजपमधील (bjp) आक्रमकपणा हरवल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेची (shiv sena) सत्ता असून भाजप विरोधी बाकांवर आहे. मुळात स्वभावाने शांत असलेल्या लोढा यांना आपल्या बांधकाम व्यवसायामुळे सत्ताधारी शिवसेनेवर टीका करताना मर्यादा येत आहेत. अशा स्थितीत केवळ २ वर्षे दूर असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी दोन हात करणाऱ्या आक्रमक नेत्याची मुंबई भाजपला गरज भासत आहे. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाकडून मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी नव्या नेत्याची चाचपणी सुरू केली आहे.

हेही वाचा-ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प, ‘या’ दिवशी होणार सादर  

मुंबई भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत विलेपार्ले येथील आमदार पराग अळवणी, अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम, कांदिवलीतील आमदार अतुल भातखळकर, मनोज कोटक, योगेश सागर आणि सुनील राणे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. त्यांच्यासोबतच आशिष शेलार यांना पुन्हा एकदा अध्यक्ष केलं जाऊ शकतं, असंही म्हटलं जात आहे. 

भाजप मुंबई अध्यक्षपदावर मराठी नेता असावा, असा पक्षनेतृत्वाचा आग्रह आहे. सोबतच मुंबईतील भाजपचा मतदार हा प्रामुख्याने उत्तर भारतीय आणि गुजराती असल्याने मराठी पाठोपाठ या दोन पर्यायांचीही चाचपणी केली जात आहे.   

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा