Advertisement

ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प, ‘या’ दिवशी होणार सादर

ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प, अजित पवार मांडणार काय मांडणार आहे. येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session) सुरूवात होणार आहे.

ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प, ‘या’ दिवशी होणार सादर
SHARES

ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प, अजित पवार मांडणार काय मांडणार आहे. येत्या २४ फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget session) सुरूवात होणार आहे. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन १८ दिवसांचं असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) अर्थसंकल्प सादर करतील. अजित पवार आपल्या राजकीय कारकिर्दीतला पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवार ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करतील. सोबतच महिलांवरील (ladies) वाढत्या अत्याचारांकडे (women safety) पाहता पीडित महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी तसंच गुन्हेगाराला जलदगतीने शिक्षा मिळावी यासाठी ‘फास्ट ट्रायल कोर्ट’ (fast trial court) स्थापन करण्यासंदर्भातील विधेयक देखील अधिवेशनात पटलावर ठेवण्यात येईल.

‘या’ मुद्द्यावर होऊ शकते चर्चा

ठाकरे सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मागील देवेंद्र फडणवीस (devendra fadanavis) सरकारने प्रचंड कर्ज (debt) करून ठेवल्याने राज्याच्या तिजोरीवरील भार वाढल्याची माहिती याआधीच अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली होती. यामुळे सरकार हात राखून खर्च करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवाय राज्यातील पायाभूत सुविधांना (infrastructure) चालना देण्यासाठीही सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेऊन निधीची तरतूद करण्याची शक्यता आहे.

राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये शेती, सिंचन आणि परिवहन प्रकल्पांना प्राथमिकता देत ९९ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. या अर्थसंकल्पातील ३८,०५४ कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक सेवांच्या विकासासाठी देण्यात आला होता. सोबतच राज्य परिवहन बस डेपो, इतर वाहतूक सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी १४,१७१.०५ कोटी रुपयांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.   

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा