Advertisement

महापालिकेला लागले 'इंदूर पॅटर्न'चे वेध

मुंबईतील कचऱ्याचं योग्य संकलन आणि शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावून कचऱ्याचं प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेनं 'इंदूर पॅटर्न' राबवावा, असा आग्रह शिवसेनेने (Shiv Sena) धरला आहे.

महापालिकेला लागले 'इंदूर पॅटर्न'चे वेध
SHARES

मुंबई महापालिकेनं (BMC) मुंबईतील कचऱ्याचा (Garbage) प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसंच, कचरा संकलनासाठी 'हैदराबाद पॅटर्न'चा (Hyderabad Pattern) वापर केला. मात्र, या पॅटर्नचा अनेक वर्ष वापर करूनही महापालिकेला अद्याप यश आलेलं नाही. त्यामुळं महापालिकेनं आता 'इंदूर पॅटर्न'चा (Indore Pattern) वापर करण्याचा घेतला आहेत. मुंबईतील कचऱ्याचं योग्य संकलन आणि शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावून कचऱ्याचं प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेनं 'इंदूर पॅटर्न' राबवावा, असा आग्रह शिवसेनेने (Shiv Sena) धरला आहे. यासाठी सोमवारी महापालिका सभागृहाची विशेष बैठक (Special Meeting) आयोजित करण्यात आली होती. 

इंदूर महापालिकेनं (Indore BMC) कचरा निर्मूलनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती या बैठकीत सादर करण्यात आली. त्यावर, प्रशासनानं या योजनांचा अभ्यास करून काही योजना राबवता येतील का, याचा विचार करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishor Pednekar) यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी अलीकडेच इंदूर शहराला भेट दिली. यावेळी इंदूर महापालिकेनं कचरा निर्मूलनासाठी केलेल्या उपाययोजना मुंबईत राबवण्यात याव्यात, असा आग्रह असंख्य सेना नगरसेवकांनी धरला.

सोमवारी महापालिका सभागृहाच्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत (Visakha Raut) यांनी हा विषय मांडला होता. मुंबईत ओला व सुका कचरा वर्गीकरण बंधनकारक असून मुंबईकर तो स्वतंत्र ठेवतात. मात्र, महापालिकेकडं स्वतंत्र वाहतूक व्यवस्था नसल्यानं हा कचरा एकाच गाडीतून वाहून नेला जातो.

इंदूरसारख्या लहान शहरात ओला व सुका कचऱ्यासह सॅनिटरी नॅपकीन, अन्य घातक वस्तूंसाठी एकाच कचरा गाडीत ३ भाग करण्यात आले आहेत. तसेच एखाद्या घरामधील कचरा उचलला गेला नाही, तर तक्रार नोंदवल्यानंतर स्वच्छता मित्र त्या घरातील कचरा उचलून महापालिकेच्या कचरा संकलन केंद्रात जमा करतो.

इंदूर महापालिकेनं खत विक्रीसाठी उघडलेल्या स्टॉलमधून खत घेणं संबंधित परिसरांना बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याशिवाय तुर्की बनावटीची यंत्रणा इथं कार्यरत असून या वर्गीकरणात प्लास्टिक बाटली, काचा, चप्पल या अन्य वस्तू वेगळ्या होतात. या वस्तू भंगारवाल्यांना विकण्यात येतात.

मुंबईत हॉटेलमध्ये अन्न शिल्लक राहिल्यानंतर ते कचऱ्यात टाकले जाते. इंदूरमध्ये उरलेले अन्न गरिबांना मिळावे, यासाठी हॉटेलबाहेर पालिकेने फ्रिज ठेवले आहेत. येथील अहिल्याबाई होळकर मंडईबाहेर महिंद्रा कंपनीने बायोगॅस निर्मितीची यंत्रणा उभी केली आहे. हा गॅस शहरातील सार्वजनिक बस वाहतुकीसाठी इंधन म्हणून वापरला जात असल्याचे विशाखा राऊत यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणले.

असा आहे इंदूर पॅटर्न

  • ओला, सुका कचरा, सॅनिटरी नॅपकीनसाठी एका गाडीत ३ भाग
  • कचरा उचलला न गेल्यास त्या माहितीची नोंद तत्काळ सॉफ्टवेअरमध्ये
  • खत विक्रीसाठी शहरात ठिकठिकाणी स्टॉल
  • कचरा वर्गीकरणासाठी तुर्की बनावटीची यंत्रणा
  • वर्गीकरणात प्लास्टिक बाटली, काचा, चप्पल वेगळ्या होतात
  • गरिबांना अन्न मिळावे यासाठी हॉटेलबाहेर फ्रीजहेही वाचा -


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा