Advertisement

देशद्रोही भाजपला दिल्लीकरांनी नाकारलं- नवाब मलिक

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (delhi vidhan sabha election 2020) आम आदमी पक्षाने (aam aadmi party) भाजपचा (bjp) धुव्वा उडवत एकहाती विजय मिळवला आहे.

देशद्रोही भाजपला दिल्लीकरांनी नाकारलं- नवाब मलिक
SHARES

दिल्ली विधानसभा निवडणुकीत (delhi vidhan sabha election 2020) आम आदमी पक्षाने (aam aadmi party) भाजपचा (bjp) धुव्वा उडवत एकहाती विजय मिळवला आहे. दिल्लीत विजयाची हॅटट्रीक करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान होणार आहेत. या निवडणुकीत देशद्रोहाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यावरून भाजपवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी दिल्लीकरांनी भाजपला नाकारून देशद्रोषी घोषित केल्याचा टोमणा हाणला. 

तर, दिल्ली हे देशातील एक वेगळं शहर आहे. तिथं अनेक राज्यांतील लोकं आहेत. त्यामुळं दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल हा दिल्लीपुरता मर्यादित नाही. बदलाचं वातावरण देशभरात आहे. भाजपच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून ती आता थांबणार नाही,' असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

हेही वाचा- ‘आप’च्या मुंबई कार्यालयातही जल्लोष, विजयाच्या हॅटट्रीकमुळे कार्यकर्ते खूष

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल समोर येऊ लागताच भाजप विरोधी पक्षांकडून भाजपवर जोरदार हल्ला चढवण्यास सुरूवात झााली. शिवसेनेचे आमदार अनिल परब (shiv sena mla anil parab) यांनी दिल्लीसारख्या छोट्या राज्यावर भाजपला विजय मिळवता आला नाही. दिल्लीतील जनतेने पुन्हा एकदा विकासालाच मत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना म्हणजेच भाजपाला नाकारलं आहे. हा पराभव म्हणजे एकप्रकारे भाजपच्या अहंकाराचा पराभव आहे, अशी टीका केली होती. 

या निवडणुकीत आम आदमी पक्षाने ६३ जागांवर विजय मिळवला असून भाजपच्या वाट्याला फक्त ७ जागा आल्या आहेत.

त्यावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी देशद्रोह्यांना मतदान करू नका, असं आवाहन केलं होतं. दिल्लीच्या जनतेने त्याचं ऐकलं असून भाजपला नाकारुन देशद्रोही घोषित करून टाकलं आहे. मलिक यांनी तीन ट्विट करत भाजपचा समाचार घेतला आहे.  

आपल्या पहिल्या ट्विटमध्ये मलिक म्हणतात की, धृवीकरण आणि फोडाफोडीचं राजकारण हारलं, बंधुभाव आणि एकता जिंकली, अहंकारी हारला, जनता जिंकली.

हेही वाचा- दिल्लीकरांनी भाजपचा अहंकार उतरवला- अनिल परब

दिल्ली निवडणुकीत भाजपने हजारो कोटी रुपये वाटल्याचा आरोपही मलिक यांनी ट्विटमधून केला. 'धन, बल और छल हार गया, विकास और विश्वास जीता', असं ट्विट मलिक यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा