Advertisement

केम छो ट्रम्प का?, मनसेचा सवाल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (american president donald trump) येत्या २४ फेब्रुवारी रोजी गुजरातमधील अहमदाबादच्या (india visit) दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावर ​महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने​​​ (mns) सवाल उपस्थित केला आहे.

केम छो ट्रम्प का?, मनसेचा सवाल
SHARES

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (american president donald trump) येत्या २४ फेब्रुवारी रोजी गुजरातमधील अहमदाबादच्या (india visit) दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (mns) सवाल उपस्थित केला आहे. ट्रम्प यांचा दौरा अहमदाबादलाच का? आणि कार्यक्रमांचं नाव केम छो? हेच का? असे दोन प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आले आहेत. 

हेही वाचा- राज ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, शरद पवारांचा टोमणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी अमेरिकेच्या ह्यूस्टन शहरातील ‘हाऊडी मोदी’ (howdy modi) कार्यक्रमात भाषण करतानाच ट्रम्प यांचा प्रचार केला होता. त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (american president donald trump) आणि त्यांच्या पत्नी २४-२५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, दिल्लीचा दौरा करणार आहेत. ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान ते अहमदाबादमध्ये (ahmedabad) आयोजित केल्या जाणाऱ्या एका भव्य-दिव्य अशा रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. तब्बल १३ किलोमीटरचा हा रोड शो असेल. त्यासाठी २.१३ कोटी रुपये खर्च करून एक व्हिआयपी रस्ता तयार करण्यात येत आहे. 

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्यासोबत ते साबरमती आश्रमालाही भेट देतील. तसंच एका नव्या-कोऱ्या सरदार वल्लभभाई पटेल क्रिकेट स्टेडियमचंही ते उद्घाटन करणार आहेत. ट्रम्प यांच्या आयोजित भेटीमुळे गुजरात विधानसभेचा अर्थसंकल्प (gujrat vidhan sabha) २४ ऐवजी २६ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात येणार आहे. अहमदाबाद भेटीच्या कार्यक्रमाला ‘केम छो मिस्टर प्रेसिडेंट’ असं नाव देण्यात आलं आहे.  

एखाद्या देशाचा प्रमुख जेव्हा भारताच्या दौऱ्यावर येतो तेव्हा आपले पंतप्रधान त्याला गुजरातमध्येच का घेऊन जातात? तिथलीच संस्कृती का दाखवतात? देशात इतर राज्ये, शहरे नाहीत का? त्यांना संस्कृती नाही काय? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी आपल्या अनेक भाषणातून उपस्थित केला आहे. त्याचाच धागा पकडत मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर (amey khopkar) यांनी ट्विटरवरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.  

हेही वाचा- शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलीय, मनसेचा पलटवार

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद ! आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे. “केम छो मिस्टर प्रेसिडेंट?”.. “केम छो?”.. “केम छो” का? असे प्रश्न अमेय खोपकर यांनी त्यांच्या ट्विटरवरून उपस्थित केले आहेत. 

संबंधित विषय
POLL

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे-भाजप यांची युती होईल, असं वाटतं का?
Submitting, please wait ...
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा