Advertisement

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात 'हेल्थ' एटीएम

पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या असणाऱ्या बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर हेल्थ एटीएम उभारण्यात आलं आहे.

पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकात 'हेल्थ' एटीएम
SHARES

दररोजच्या धावपळीच्या जीवनात मुंबईकर आपल्या आरोग्याकडं दुर्लक्ष करत असतात. अनेक जण नियमित आरोग्य तपासणी करण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी दाखल करत आहेत. त्यामुळं त्यांची यातून सुटका करण्यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनानं ८ स्थानकांवर हेल्थ एटीएम सरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या असणाऱ्या बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर हेल्थ एटीएम उभारण्यात आलं असून, फेब्रूवारी महिन्याच्या अखेरीस ते सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मध्य व पश्चिम रेल्वेमार्फत पहिल्या टप्प्यात ८ स्थानकांमध्ये हे हेल्थ एटीएम सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य स्थानकांचा विचार केला जाणार असल्याचं समजतं. या हे हेल्थ एटीएममध्ये बॉडी मास इंडेक्स (BMI), हाडं, वजन, आंत्र रोग यांसह १६ प्रकारच्या आरोग्य चाचण्यांची तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

ज्या प्रवाशाला आपल्या आरोग्याची तपासणी करायची आहे, ते या हेल्थ एटीएममध्ये जाऊ शकतात. हे हेल्थ एटीएम मूलभूत प्रयोगशाळेच्या चाचणी आणि आपत्कालीन सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. तसंच, त्यामध्ये एक वैद्यकीय कर्मचारीही असणार आहे. कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी, फुफ्फुसीय परीक्षा, स्त्रीरोगशास्त्र या संदर्भात सल्ला घेणं देखील शक्य होणार आहे.

हे एटीएम कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमाचा एक भाग असणार आहे. हे हेल्थ एटीएम सर्व प्रवाशांना प्रथमोपचार देणार आहेत. या हेल्थ एटीएमच्या स्थापनेच्या ३ महिन्यांत हे रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत बॉडी स्क्रीनिंगची सुविधा देणार आहे.

पहिल्या ठप्प्यातील मध्ये रेल्वेवरील हेल्थ एटीएम

  • ठाणे
  • कल्याण
  • लोकमान्य टिळक टर्मिनस

पहिल्या ठप्प्यातील पश्चिम रेल्वेवरील हेल्थ एटीएम

  • अंधेरी
  • चर्चगेट
  • मुंबई सेंट्रल
  • दादर
  • बोरिवालीहेही वाचा -

बसथांब्यावर मृत्यू पावलेल्या 'त्या' मुलाला अखेर ३ वर्षांनी न्याय

हार्बर मार्गावर एप्रिलपासून लागू होणार नवं वेळापत्रक?Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा