Advertisement

हार्बर मार्गावर एप्रिलपासून लागू होणार नवं वेळापत्रक?

हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल, अंधेरी या हार्बर आणि ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरही सुधारित वेळापत्रक एप्रिल २०२० पासून लागू केलं जाणार आहे.

हार्बर मार्गावर एप्रिलपासून लागू होणार नवं वेळापत्रक?
SHARES

हार्बर मार्गावरील (Harbour Railway) रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. हार्बर रेल्वेच्या सीएसएमटी (CSMT) ते पनवेल (Panvel), अंधेरी (Andheri) या हार्बर आणि ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गावरही सुधारित वेळापत्रक (New Timetable) एप्रिल २०२० पासून लागू केलं जाणार आहे. गतवर्षी मध्य रेल्वेच्या (Central Railway) लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता.

नव्या वेळापत्रकानुसार, सध्याच्या एसी लोकलच्या (Ac Local) फेऱ्या अतिरिक्त म्हणून चालवण्याचा विचार सुरू असून, प्रवाशांना (Passengers) दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय हार्बर मार्गावर अंधेरी ते पनवेल असलेल्या लोकल फेऱ्या गोरेगावपासूनही चालवण्यासाठी वेळापत्रकावर काम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.

ठाणे ते पनवेल मार्गावर एसी लोकल सुरू झाली असून, या लोकलच्या दिवसाला १६ फेऱ्या चालवण्यासाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सामान्य लोकलच्या (Local) फेऱ्या रद्द करण्याऐवजी एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या म्हणून चालवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. याची दखल रेल्वे प्रशासनानं नव्या वेळापत्रकात (New Timetable) घेतल्याचं माहिती मिळते.

एप्रिल २०२० पासून हार्बर (Harbour Railway) आणि ट्रान्स हार्बरवर (Transe Harbour) लोकलचे नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. या वेळापत्रकावर (Timetable) मध्य रेल्वेकडून (Central Railway) काम सुरू आहे. सध्याच्या एसी लोकल (Ac Local) गाडीला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसादाची माहिती मध्य रेल्वेकडून घेतली जात आहे.

सध्या सीएसएमटी ते गोरेगावपर्यंत ८६ लोकल फेऱ्या अप-डाऊन करतात. तर अंधेरी ते पनवेल अप व डाऊन १८ लोकल फेऱ्या होतात. अंधेरीपर्यंत असणाऱ्या हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार गेल्या वर्षी केल्यानंतरही गोरेगाव ते पनवेल लोकल फेऱ्या अद्यापही सुरू होऊ शकल्या नाहीत. यात जोगेश्वरी, गोरेगाव स्थानकाजवळ लोकल उभे करण्यासाठी (सायडिंग) तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळेच गोरेगावपासून पनवेलसाठी लोकल सेवा सुरू होऊ शकत नव्हती.

पश्चिम रेल्वेकडून त्याला मंजुरीही मिळत नव्हती. मात्र हा तिढा सुटला असून पश्चिम रेल्वेनं मंजुरी दिल्याचं समजतं. त्यामुळं गोरेगावपासून पनवेलसाठी लोकल धावणं आता शक्य होणार आहे. सध्या अप-डाऊन १८ फेऱ्या अंधेरी ते पनवेलसाठी होत असून यातील कोणत्या फेऱ्यांचा विस्तार करणं शक्य आहे, त्यावर काम सुरू आहे.



हेही वाचा -

मुंबई पूर्व उपनगरात १५ टक्के पाणीकपात

सायन उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा