सावधान ! असा फोन तुम्हालाही येऊ शकतो...


सावधान ! असा फोन तुम्हालाही येऊ शकतो...
SHARES

कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास जरा सावध व्हा ! कारण अशाच प्रकारे एका खासगी कंपनीच्या संचालकाला फोन करून आपण आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स ऑफिसमधून बोलत असल्याचा बनाव करून लाच मागणाऱ्या एका भामट्याला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव श्याम मुंदडा (51) असे आहे. पण यामधील मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार आहे.


मोडस ऑपरेंडी...

फायर सेफ्टीमधील एका कंपनीच्या संचालकांना 30 मे रोजी एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. कॉलरने आपले नाव पंकज मेहता असल्याचे सांगत आपण आयकर विभागाच्या ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. तो इथपर्यतच थांबला नाही, तर तुमची इन्कम टॅक्सची फाईल माझ्याकडे आली असून त्यात अनेक त्रुटी असल्याचे त्याने कंपनीच्या संचालकाला सांगितले. तो पुढे म्हणाला, 'जर कारवाईपासून बचाव करायचा असेल, तर 3 लाख रुपये द्यावे लागतील'. अशा प्रकारे आरोपी कित्येक दिवस सदर संचालकाला फोन करुन त्रास देत होता. लाच देण्याची इच्छा नसलेल्या संचालकाने शेवटी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सापळा रचून अंधेरीतील एका हॉटेलमधून 25 हजारांचा धनादेश घेताना श्याम मुंदडा नावाच्या व्यक्तीला रंगेहात पकडले.


हेही वाचा

मंत्र्यांच्या घरूनच आला त्याला खंडणीचा फोन


आरोपी श्यामला न्यायालयात हजर केले असता त्याला 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार असून सध्या आंबोली पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा