मंत्र्यांच्या घरूनच आला त्याला खंडणीचा फोन


मंत्र्यांच्या घरूनच आला त्याला खंडणीचा फोन
SHARES

वाळू व्यवसायिकाकडून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या टायपिस्टला अटक झाली आहे. महेश सावंत(38) असे या लिपिकाचे नाव असून विदर्भातीला एका वाळू व्यावसायिकाकडून रामदास कदम यांच्या नावावर खंडणी मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

असे सांगितले जात आहे की, दोन महिन्यांपूर्वी महेश सावंतला रामदास कदम यांच्या कार्यालयातूनच वाळू व्यावसायिकाचा मोबाईल नंबर मिळाला होता. त्यानंतर काही दिवसातच कार्यालयात कोणी नसल्याचा फायदा उचलत सावंत यांनी व्यवसायिकाला फोन केला आणि 10 लाख रुपयांची मागणी केली. अन्यथा कडक कारवाई करण्याची धमकी दिली. धास्तावलेल्या व्यावसायिकाने कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांकडे जेव्हा याची चौकशी केली. तेव्हा हे कारस्थान लिपिक सावंत याचे असल्याचे स्पष्ट झालं. लिपिक सावंतचे नाव समोर येताच रामदास कदमांचे पीए यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात सावंत विरोधात गुन्हा दाखल केला आणि शुक्रवारी लिपिक महेश सावंतला खंडणी मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली. या आधी कधी सावंत यांनी अशा प्रकारे खंडणी मागितली आहे का, याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय