शिवसेना उपविभागप्रमुखांवर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

विक्रोळी येथे शिवसेना उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

शिवसेना उपविभागप्रमुखांवर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक
SHARES

विक्रोळी येथे शिवसेना उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. परदेशात असलेल्या गॅंगस्टर प्रसाद पुजारी याने या हल्ल्याची सुपारी दिल्याचं तपासात उघड झालं आहे. या गुन्ह्याचा तपास मुंबई क्राईम ब्रँच आणि खंडणी विरोधी पथक करत आहे. 

 विक्रोळी येथे ९ डिसेंबर रोजी शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव हे सकाळी देवळात दर्शनाला गेले असताना त्यांच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्यात एक गोळी जाधव यांच्या खांद्याला लागून गंभीर दुखापत झाली. त्यावेळी मंदिरात उपस्थित असलेल्या लोकांनी दोघांपैकी एका हल्लेखोराला पकडलं. आरोपी सागर मिश्रा तपासात कोणतीच माहिती देत नव्हता. हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राच्या साहाय्याने क्राईम ब्रँचहे शस्त्र कानपूर आॅर्डनन्स फॅक्टरीमध्ये तयार केलं असल्याचं समजलं.

खंडणी विरोधी पथकाने मध्य प्रदेशमधून कृष्णधर सिंह तर ठाण्यातून आनंद फडतरे याला अटक केली आहे. आरोपींना १ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रसाद पुजारीने मुंबईत आपली दहशत निर्माण करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये असलेला मित्र कृष्णधर सिंह आणि सागर मिश्रा या दोघांना चंद्रशेखर जाधव यांच्यावर हल्ला करण्यासाठी मुंबईत पाठविले होते. मुंबईतील प्रसाद पुजारीच्या एका साथीदाराने या दोघांच्या राहण्याची सोय केली आणि विना नंबर प्लेटची बाईक यांना पुरवली.



हेही वाचा -
बेशिस्त मुंबईकरांवर आता १० हजार कॅमेऱ्यांची नजर
सेक्स रॅकेटसाठी व्हॉट्सअॅप, टिकटॉकचा वापर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा